Nana Patole Viral Video Pudhari
मुंबई

Nana Patole Viral Video: गुरुपौर्णिमेला नाना पटोले यांचे पाय दुधाने धुतल्याचा व्हिडीओ व्हायरल; बावनकुळे यांची काँग्रेसवर टीका

हा व्हिडीओ व्‍हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर जोरदार प्रतिक्रिया उमटल्या.

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या समर्थकांनी गुरुपौर्णिमेनिमित्त त्यांचे पाय दुधाने धुतल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यावरून राज्याच्या राजकारणात नवी चर्चा सुरू झाली आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये नाना पटोले खुर्चीवर बसलेले दिसत आहेत. त्यावेळी दोन समर्थक त्यांच्या पायांवर पाणी आणि दूध ओतून पाद्यपूजन करताना दिसतात. त्यानंतर त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात येते आणि गुरुपौर्णिमेनिमित्त पारंपरिक पद्धतीने पूजन केले जाते.

हा व्हिडीओ व्‍हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर जोरदार प्रतिक्रिया उमटल्या. काहींनी या कृतीवर टीका केली, तर काहींनी तो समर्थकांचा वैयक्तिक श्रद्धेचा भाग असल्याचे मत व्यक्त केले.

या घटनेवर प्रतिक्रिया देताना मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, ‘अशा प्रकारच्या कृती करणे ही काँग्रेस नेत्यांची संस्कृती आहे. अशा घटनांमधून त्यांनी धडा घ्यायला हवा. अशा गोष्टींमुळे टीका आणि नकारात्मक प्रसिद्धीच मिळते.’

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT