Chandrakant Patil On Thorat pudhari
मुंबई

Chandrakant Patil On Thorat: थोरातांच्या 'त्या' भेटीवर काय म्हणाले चंद्रकांत पाटील? राज ठाकरेंनाही मारला टोमणा

Anirudha Sankpal

Chandrakant Patil On Thorat: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी आज भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली. ही भेट अचानक झाल्यानं राजकीय वर्तुळात याबाबत जोरदार चर्चा सुरू झाली होती. दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना याबाबत खुसाला केला. तसेच त्यांनी पंतप्रधानांना पत्र लिहिणाऱ्या राज ठाकरे यांना देखील टोला मारला.

चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना संजय राऊत यांच्यावर बोलायचं आहे का असं म्हणत हास्यविनोद केला. त्यांनी अनेक संस्था फेक कोर्सेस चावलत आहेत याबाबत देखील उत्तर दिलं. ते म्हणाले, 'महाराष्ट्रात एखादी संस्था फेक कोर्सेस चालवते ज्याला परवानगी नसते तेव्हा अनेक लोक शासनाकडे दाद मागतात. हिरे कॉलेजमध्ये चार वर्षे फेक कोर्स सुरू होता. आता या कॉलेजवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. आता मुंबई विद्यापीठाशी बोलून न्याय देण्याचा प्रयत्न करू.' असं आश्वासन चंद्रकांत पाटील यांनी दिली.

चंद्रकांत पाटील यांनी अनेक ठिकाणी असे कोर्सेस सुरू असतील तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल आम्ही या कॉलेजबाहेर बोर्ड लावणार आहोत. हे बोर्ड महाराष्ट्र शासनाकडून लावले जातील असं देखील पाटील म्हणाले, यावेळी पत्रकारांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या भेटीबाबत विचारण्यात आलं. त्यावेळी ते कॉलेजच्या कामासाठी भेटायला आले होते असं सांगून विषय संपवला.

चंद्रकांत पाटील यांनी राज ठाकरेंच्या पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर लिहिलेल्या पत्रावरही थोडक्यात प्रतिक्रिया दिली. त्यांनी राज ठाकरे हे मोठे व्यक्तीमत्व आहे. मोदीजींनी निर्णय घेतला तो सर्वसामान्य नागरिकांना समोर ठेवून घेतला आहे. दरवाढ करण्यात आलेली नाही. आपण काय करायचे आहे हे त्यांनी सांगितलं व्यावहारिक आहे तेच त्यांनी सांगितल असं देखील पाटील म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT