चांदिवलीचा एक्यूआय गेला थेट पाचशेपार ! pudhari photo
मुंबई

Mumbai air pollution : चांदिवलीचा एक्यूआय गेला थेट पाचशेपार !

पाचशेहून अधिक एक्यूआय पाहता या भागातील नागरिकांना श्वास घेणे मुश्किल

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: मुंबई शहर आणि उपनगरांतील हवा अति खराब असतानाच सांताक्रुझ पाठोपाठ चांदिवलीमध्ये वायू प्रदूषणाने टोक गाठले आहे. दोन्ही ठिकाणी हवा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) पाचशेपार गेला.

एक्यूआय संकेस्थळानुसार, रविवारी सांताक्रुझचा एक्यूआय) 465 इतका होता. सोमवारी त्यात 64ने वाढ झाली. सांताक्रुझला प्रदूषणाने घेरले असतानाच खराब हवेचे ढग चांदिवलीपर्यंत पोहोचले. पाचशेहून अधिक एक्यूआय पाहता या भागातील नागरिकांना श्वास घेणे मुश्किल झाले आहे.

वडाळा भागातही (219);वायू प्रदूषणाचा टक्का वाढत आहे. तेथील हवा गुणवत्ता निर्देशांक दोनशेपार गेला आहे. हिरानंदानी गार्डन (197), जुहूतारा (193), गोवंडी (192), साकीनाका/शिवडी (186) आणि चेंबूर (185) परिसरही प्रदूषणाने व्यापला आहे.

  • सांताक्रुझ/ चांदिवली 529, वडाळा 219

  • हिरानंदानी 197, जुहूतारा 193, गोवंडी 192

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT