मुंबई : मध्य रेल्वेने विशेष आणि नियमित तिकीट तपासणी मोहिमांद्वारे एप्रिल ते ऑगस्ट 2025 या पाच महिन्यात अयोग्य तिकीटासह किंवा अवैध प्रवास करणार्या 17.19 लाख प्रवाशांवर कारवाई केली आहे. त्यांच्यांकडून 100 कोटी इतका विक्रमी दंडही वसूल केला आहे.
ऑगस्ट 2025 महिन्यात, मध्य रेल्वेच्या तिकीट तपासणी टीमने 2.76 लाख प्रवाशांना तिकीटाशिवाय प्रवास करताना ताब्यात घेतले. जे ऑगस्ट 2024 मधील 2.34 लाख प्रवाशांशी तुलना करता 18 टक्के जास्त होते.
ऑगस्ट 2025 मध्ये तिकीटाशिवाय प्रवास करणार्यांकडून 13.78 कोटी दंड वसूल केला गेला, तर ऑगस्ट 2024 मध्ये या दंडाची रक्कम 8.85 कोटी होती.
विभागवार विनातिकीट प्रवाशांवरील कारवाई
विभाग प्रकरणे दंड (कोटींमध्ये)
मुंबई 7.03 लाख 29.17
पुणे 1.89 लाख 10.41
भुसावळ 4.34 लाख 36.93
नागपूर 1.85 लाख 11.44
पुणे 1.89 लाख 10.41
सोलापूर 1.04 लाख 5.01