Central Railway Mega Block Pudhari
मुंबई

Mega Block: हार्बर, ट्रान्स-हार्बरवर रविवारी मेगाब्लॉक

ब्लॉक कालावधीत बेलापूर/नेरुळ आणि उरण स्थानकांदरम्यान पोर्ट मार्गावरील सेवा उपलब्ध असतील.

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: मध्य रेल्वेने मुंबई विभागात विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी रविवार 5 एप्रिलला पनवेल आणि वाशी स्थानकांदरम्यान सकाळी 11.05 ते सायंकाळी 4.05 वाजेपर्यंत अप व डाऊन हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेतला आहे. ब्लॉक कालावधीत विशेष उपनगरीय गाड्या चालवण्यात येतील. ब्लॉक कालावधीत बेलापूर/नेरुळ आणि उरण स्थानकांदरम्यान पोर्ट मार्गावरील सेवा उपलब्ध असतील.

ट्रान्स-हार्बर मार्ग सेवा

पनवेलहून ठाण्याच्या दिशेने जाणारी अप ट्रान्स-हार्बर मार्ग सेवा जी सकाळी 11:02 ते दुपारी 3:53 या वेळेत पनवेल येथून सुटते आणि ठाणे येथून पनवेलच्या दिशेने जाणारी डाऊन ट्रान्स-हार्बर मार्ग सेवा जी सकाळी 10:01 ते दुपारी 3:20 या वेळेत ठाण्याहून सुटते, या सर्व सेवा रद्द राहतील.

हार्बर मार्ग सेवा

पनवेल येथून सकाळी 10:33 ते दुपारी 3:49 या वेळेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने सुटणाऱ्या अप हार्बर मार्ग सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 9:45 ते दुपारी 3:12 या वेळेत पनवेल/ बेलापूरच्या दिशेने सुटणाऱ्या डाऊन हार्बर मार्ग सेवा रद्द राहतील.

पश्चिम रेल्वेचा रात्रकालीन ब्लॉक

पश्चिम रेल्वेवर 4 आणि 5 एप्रिलदरम्यान मुंबई सेंट्रल आणि माहीम स्थानकादरम्यान रात्रकालीन ब्लॉक असेल. रात्री सव्वा बारा ते पहाटे सव्वा चार पर्यंत हा ब्लॉक असेल. या कालावधीत मार्गावरील सर्व गाड्या सांताक्रूझ आणि चर्चगेट स्थानकाच्या दरम्यान धीम्या मार्गावरून चालविल्या जातील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT