Mumbai Central Railway Pudhari
मुंबई

Central Railway Mega Block: मध्य रेल्वेवर ४ ऑक्टोबरला मेगा ब्लॉक; प्रवाशांनी वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडावे

यात मेन लाईन, हार्बर लाईन, ट्रान्स हार्बर लाईनचा समावेश आहे.

Anirudha Sankpal

Central Railway Mega Block: मुंबईतील मध्य रेल्वेच्या अनेक मार्गांवर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी ४ ऑक्टोबरला मेगा ब्लॉकची घोषणा करण्यात आली आहे. हा मेगा ब्लॉक उपनगरीय मार्गांवर असणार आहे. यात मेन लाईन, हार्बर लाईन, ट्रान्स हार्बर लाईनचा समावेश आहे. याबाबतची माहिती पुढील प्रमाणे...

मेन लाईन

  • CSMT ते विद्याविहार दरम्यान अप-डाऊन धीम्या मार्गावर ब्लॉक

  • वेळ : सकाळी १०.५५ ते दुपारी ३.५५

  • CSMTहून सकाळी १०.४८ ते दुपारी ३.४५ दरम्यान सुटणाऱ्या डाऊन धीम्या लोकल जलद मार्गावर वळवण्यात येणार

  • या लोकलना भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला येथे थांबा

  • विद्याविहार येथे पुन्हा धीम्या मार्गावर वळवण्यात येणार

  • घाटकोपरहून सकाळी १०.१९ ते दुपारी ३.५२ दरम्यान सुटणाऱ्या अप धीम्या लोकल जलद मार्गावर वळवण्यात येणार

  • या लोकलना कुर्ला, शीव, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा येथे थांबा

हार्बर लाईन

  • पनवेल ते वाशी दरम्यान अप-डाऊन हार्बर मार्गावर ब्लॉक

  • वेळ : सकाळी ११.०५ ते सायंकाळी ४.०५

  • पनवेलहून CSMTकडे जाणाऱ्या सकाळी १०.३३ ते दुपारी ३.४९ दरम्यानच्या अप हार्बर लोकल रद्द

  • CSMTहून बेलापूर/पनवेलकडे जाणाऱ्या सकाळी ९.४५ ते दुपारी ३.१२ दरम्यानच्या डाऊन हार्बर लोकल रद्द

  • पोर्ट मार्गावरील सेवा सुरू राहणार

  • CSMT–वाशी दरम्यान विशेष उपनगरीय सेवा चालवण्यात येणार

ट्रान्स-हार्बर लाईन

  • पनवेल–ठाणे अप सेवा : सकाळी ११.०२ ते दुपारी ३.५३ रद्द

  • ठाणे–पनवेल डाऊन सेवा : सकाळी १०.०१ ते दुपारी ३.२० रद्द

  • ठाणे–वाशी/नेरुळ दरम्यान ट्रान्स-हार्बर सेवा उपलब्ध राहणार

  • पायाभूत सुविधांची देखभाल आणि सुरक्षिततेसाठी मेगा ब्लॉक घेण्यात येणार

  • गैरसोयीबद्दल मध्य रेल्वे प्रशासनाकडून दिलगिरी व्यक्त

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT