Mumbai Mega Block Pudhari
मुंबई

Mumbai Mega Block: उद्या मध्य रेल्वेवर विद्याविहार-ठाणे मेगा ब्लॉक

या मेगा ब्लॉकमुळे काही डाऊन मेल/एक्सप्रेस गाड्या विद्याविहार स्थानकावर 'डाऊन जलद' मार्गिकेवर वळवल्या जाणार आहेत.

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: मध्य रेल्वे उपनगरीय मार्गांवर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी रविवार १९ जुलै रोजी 'मेगा ब्लॉक' घेण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वे मुंबई विभागाने दिली आहे.

या मेगा ब्लॉकमुळे काही डाऊन मेल/एक्सप्रेस गाड्या विद्याविहार स्थानकावर 'डाऊन जलद' मार्गिकेवर वळवल्या जाणार आहेत. तसेच ठाणे स्थानकावर पुन्हा ५व्या मार्गिकेवर वळवल्या जाणार आहेत. त्यामुळे गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने धावणार आहेत.

यामध्ये कुर्ला एलटीटी- गोरखपूर एक्सप्रेस, जयनगर एक्सप्रेस, तिरुवनंतपुरम नेत्रावती एक्सप्रेस, काकीनाडा पोर्ट एक्सप्रेसचा समावेश आहे. तसेच ठाणे स्थानकावर सर्व गाड्या जलद' मार्गिकेवर वळवल्या गेल्याने पुणे- मुंबई सिंहगड एक्सप्रेस, डेक्कन क्वीन, मंगळुरू - मुंबई एक्सप्रेस, राजगीर - कुर्ला एलटीटी, काकीनाडा पोर्ट, प्रगती एक्सप्रेस, सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस, बनारस - कुर्ला एक्सप्रेस, हावडा- मुंबई. एक्सप्रेस, हटिया - कुर्ला एलटीटी एक्सप्रेस उशीराने पोहोचणार आहेत.

ट्रान्स-हार्बर लाईन: ठाणे आणि वाशी/नेरुळ दरम्यान अप आणि डाऊन ट्रान्स-हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० वाजेपर्यंत मेघा ब्लॉक असणार आहे. या दरम्यान ठाणे आणि वाशी/नेरुळ/पनवेल दरम्यान अप आणि डाऊन ट्रान्स-हार्बर मार्गावरील सेवा बंद राहणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT