Railway pudhari photo
मुंबई

Central Railway Train Delays: मध्य रेल्वेवर साखळी खेचण्याच्या सात घटना; लोकलसह मेल-एक्स्प्रेस गाड्यांना विलंब

लोकलसह, मेल-एक्स्प्रेसचा खोळंबा; प्रवाशांना नाहक त्रास

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: मध्य रेल्वे मार्गावर वेगवेगळ्या ठिकाणी आपत्कालीन साखळी खेचण्याच्या सात घटना सोमवारी घडल्या. यामुळे मध्य रेल्वेचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले होते. अनेक गाड्या विलंबाने धावत होत्‍या, तसेच एक लोकलही रेल्वे प्रशासनाला रद्द करावी लागली.

मध्य रेल्वेवर सोमवारी पाच मेल-एक्सप्रेस आणि एका लोकलमध्ये साखळी खेचल्यामुळे रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. या घटनांमुळे काही गाड्या एकाच ठिकाणी थांबवून ठेवाव्या लागल्या.

त्याचा फटका लोकल आणि मेल-एक्सप्रेस गाड्यांनाही बसला. अनेक लोकल उशिराने धावल्या होत्या, तर ठाणे - कल्याण दरम्यान एक लोकल रद्द करावी लागली. याचा त्रास लांब प्रवासासाठी निघालेल्या प्रवाशांना सहन करावा लागला.

यामध्ये एलटीटी-आझमगड एक्स्प्रेसमध्ये पहाटे ५.४१ वाजता साखळी खेचण्यात आली. त्याचा परिणाम टिटवाळा आणि कसारा मार्गावरील लोकल वाहतुकीवर झाला. टिटवाळा-सीएसएमटी लोकलमध्ये सकाळी ९.१८ ते ९.२२ दरम्यान विद्याविहार आणि कुर्ला दरम्यान साखळी खेचण्यात आली.

तसेच गोदान एक्स्प्रेसमध्ये दुपारी १२.०७ ते १२.१६ या वेळेत कल्याण स्थानकात साखळी खेचण्यात आली. मऊ एक्स्प्रेसमध्ये दुपारी १२.३४ ते १२.४७ या वेळेत कल्याण ते शहाडदरम्यान साखळी खेचण्यात आली.

पवन एक्स्प्रेसमध्ये दुपारी १२.५० ते १२.५३ या दरम्यान साखळी खेचल्याने अंबरनाथ आणि टिटवाळा मार्गावरील लोकलचे वेळापत्रक कोलमडले. तसेच उद्यान एक्स्प्रेसमध्ये साखळी खेचण्यात आल्याने गाडी दुपारी १.१५ ते १.२२ या वेळेत कल्याण स्थानकात उभी होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT