Central Railway Train Cancellation pudhari photo
मुंबई

Central Railway Train Cancellation: कसारा ब्लॉकमुळे मध्यरात्रीच्या गाड्यांवर परिणाम

आसनगाव-कसारा तिसऱ्या रेल्वे मार्गिकेचे काम अंतिम टप्प्यात; शनिवार दुपारपासून रविवार पहाटेपर्यंत ब्लॉक

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: मध्य रेल्वेद्वारे आसनगाव-कसारा तिसरी रेल्वे मार्गिका आणि कसारा यार्ड लाईन विस्तारीकरणाच्या कामासाठी घेण्यात आलेल्या १२ दिवसांचा विशेष ब्लॉक रविवारी पूर्ण होणार आहे.

त्यामुळे शनिवार ( १७ ऑक्टोबर ) दुपारी २:३० पासून ते रविवार ( १८ ऑक्टोबर ) पहाटे ३ वाजेपर्यंत असा १२ तास ३० मिनिटांचा हा ब्लॉक असणार आहे. या दरम्यान शनिवार-रविवारच्या मध्य रात्रीच्या सर्व गाड्यांवर परिणाम होणार आहे.

या मेल आणि एक्स्प्रेस गाड्या रद्द

  • अमरावती-सीएसएमटी सुपरफास्ट एक्स्प्रेस

  • नागपूर-सीएसएमटी सेवाग्राम एक्स्प्रेस

  • सीएसएमटी -साईनगर शिर्डी वंदे भारत एक्स्प्रेस

  • सीएसएमटी -धुळे एक्स्प्रेस

  • सीएसएमटी - नागपूर सेवाग्राम एक्स्प्रेस

  • सीएसएमटी - बल्हारशाह एक्स्प्रेस

  • सीएसएमटी -मनमाड पंचवटी एक्स्प्रेस

  • सीएसएमटी -अमरावती सुपरफास्ट एक्स्प्रेस

  • मनमाड-सीएसएमटी - पंचवटी एक्स्प्रेस

  • धुळे-सीएसएमटी एक्स्प्रेस

  • साईनगर शिर्डी-सीएसएमटी वंदे भारत एक्स्प्रेस

  • बल्हारशाह-सीएसएमटी एक्स्प्रेस

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT