Amla Railway Reservoir Pudhari
मुंबई

Amla Railway Reservoir: 'आमला' जलाशय पाणी साठवण क्षमता ३.५ पटीने वाढवली; संभाव्य दुष्काळाशी सामना करण्यासाठी मध्य रेल्वेने केली तयारी

नागपूर विभागातील आमला रेल्वे जलाशयातील गाळ काढण्यासह दुरुस्तीची कामे पूर्ण; रेल्वेच्या पाणीपुरवठ्यासाठी होणार फायदा

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: राज्यातील दुष्काळाचा सामना करण्यासाठी मध्य रेल्वेने स्वतःच्या जलाशयांची पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून नागपूर विभागातील 'आमला रेल्वे जलाशयात' गाळ काढणे आणि विविध दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करण्यात आली आहेत.

त्यामुळे आमला' जलाशयाची पाणी साठवण क्षमता ३.५ पटीने वाढवली आहे. रेल्वेच्या पाण्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी हा जलाशय महत्वाचा आहे.

मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार नागपूरच्या आमला रेल्वे जलाशयात अंदाजे ३०० मीटर × १९८.५ मी.क्षेत्रफळावर आणि सरासरी ४ मी. खोलीपर्यंत गाळ काढण्याचे काम करण्यात आले आहे. या कामामुळे जलाशयाची पाणी साठवण क्षमता ९३.७५ दशलक्ष लिटरवरून ३३१.९५ दशलक्ष लिटरपर्यंत वाढली आहे.

म्हणजेच, पाणी साठवण क्षमतेत अंदाजे २३८.२ दशलक्ष लिटर इतकी वाढ झाली आहे. ती मूळ क्षमतेच्या ३.५ पट आहे. या जलाशयाची स्वच्छताही झाली आहे. यात अंदाजे २.३८ लाख घनमीटर गाळ काढण्यात आला आहे.

यामुळे पाण्याची गुणवत्ता सुधारली असून वापरासाठी अधिक सुरक्षित पाणी उपलब्ध झाले आहे. या उपक्रमामुळे उपलब्ध जलसंपत्तीचे व्यवस्थापन सुधारण्यास, रेल्वेच्या पाण्याची गरज भागवण्यास आणि जलसंधारणाचे प्रयत्न बळकट करण्यास मदत होणार असल्याचे मध्य रेल्वेने सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT