Doctors Pudhari
मुंबई

CCMP BHMS Registration Strike | सीसीएमपी नोंदणीवरून राज्यभर डॉक्टरांचा २४ तासांचा संप; निर्णय कायम राहिल्यास बेमुदत आंदोलन

CCMP BHMS Registration Strike | सीसीएमपी नोंदणीवरून आज राज्यभर डॉक्टरांचा २४ तासांचा संप; निर्णय कायम राहिल्यास बेमुदत आंदोलनाचा इशारा

पुढारी वृत्तसेवा

CCMP-BHMS नोंदणीच्या निर्णयाविरोधात महाराष्ट्रातील विविध डॉक्टर संघटनांनी आज २४ तासांचा राज्यव्यापी संप पुकारला आहे. या निर्णयामुळे वैद्यकीय क्षेत्रावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त करत डॉक्टरांनी सरकारकडे तातडीने निर्णयाचा पुनर्विचार करण्याची मागणी केली आहे. मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही संघटनांनी दिला असून राज्यातील आरोग्य क्षेत्राचे लक्ष आता सरकारच्या पुढील भूमिकेकडे लागले आहे.

CCMP BHMS Registration Strike

मुंबई : सीसीएमपी प्रमाणपत्रधारक BHMS डॉक्टरांना महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल (MMC) मध्ये नोंदणी देण्याच्या प्रस्तावाविरोधात आज (४ ऑगस्ट) राज्यभरातील डॉक्टरांनी संप केला आहे. २४ तासांच्या वैद्यकीय सेवा बंद आंदोलनाला सुरुवात केली असून या आंदोलनात राज्यभरातील सुमारे ५० हजार डॉक्टर, तर मुंबईतील सुमारे ६ हजार डॉक्टर सहभागी झाले आहेत. त्यामुळे आज खासगी रुग्णालयांतील नियमित ओपीडी सेवा विस्कळीत होण्याची शक्यता आहेत. अनेक रुग्णांना उपचाराविना परत जावे लागू शकते.

आज सकाळी ६ वाजल्यापासून सुरू झालेला हा संप उद्या (५ ऑगस्ट) सकाळी ६ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. मात्र, शासनाने MMC नोंदणीचा प्रस्ताव लागू केल्यास हे आंदोलन बेमुदत करण्याचा इशारा डॉक्टर संघटनांनी दिला आहे.

रुग्ण सुरक्षा, वैज्ञानिक वैद्यकीय उपचारपद्धती आणि आधुनिक वैद्यकाची गुणवत्ता अबाधित ठेवण्यासाठी हे आंदोलन असल्याचा दावा डॉक्टर संघटनांनी केला आहे. हा लढा कोणत्याही वैद्यकीय शाखेविरोधात नसून रुग्णहितासाठी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) महाराष्ट्र, महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स (MARD), असोसिएशन ऑफ स्टेट मेडिकल इंटर्न्स (ASMI) तसेच इतर वैद्यकीय संघटनांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.

दरम्यान, या आंदोलनामुळे राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आणि संलग्न रुग्णालयांतील नियमित ओपीडी सेवा व इतर काही आरोग्यसेवांवर परिणाम होणार आहे. मात्र, अत्यावश्यक व आपत्कालीन सेवा पूर्ववत सुरू राहतील, अशी माहिती आयएमए महाराष्ट्रचे खजिनदार डॉ. अनंत गीते यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT