CBSE Middle East Exam Pudhari
मुंबई

CBSE Middle East Exam: मध्यपूर्वेतील तणावाचा परिणाम; सीबीएसईच्या दहावी-बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या

बहरीन, यूएईसह 7 देशांतील 2 मार्चचे पेपर रद्द; 5 मार्चबाबतचा निर्णय 3 मार्चला

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसईने परदेशातील विविध देशांमधील परीक्षा केंद्रांवर सोमवारी (दि. 2) होणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षेतील पेपर रद्द केले आहेत. तसेच 5 मार्चच्या परीक्षेविषयीची माहिती 3 मार्चला देण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

मध्य पूर्वेतील काही भागांमधील सध्याच्या परिस्थितीचा हवाला देत सीबीएसईने स्पष्ट केले की, मध्य पूर्वेतील काही भागांमधील (बहरीन, इराण, कुवेत, ओमान, कतार, सौदी अरेबिया आणि यूएई) सध्याच्या परिस्थितीमुळे बोर्डाने सोमवार, 2 मार्च रोजी होणाऱ्या मध्य पूर्व प्रदेशात दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

मंगळवारी (3 मार्च) परिस्थितीचा आढावा घेण्यात येईल आणि 5 मार्चपासून होणाऱ्या परीक्षांबाबत योग्य निर्णय घेतला जाईल. सीबीएसईने सर्व विद्यार्थ्यांना अधिक माहितीसाठी त्यांच्या शाळांच्या संपर्कात राहण्याचा आणि अधिकृत घोषणांचे काळजीपूर्वक पालन करण्याचा सल्ला दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT