Arrested Pudhari
मुंबई

Cyber Farud: सायबर फसवणुकीसाठी घाऊक सिमकार्ड्‌स देणाऱ्यास अटक; बिहार-ओडिशातील १० ठिकाणी छापे

१,३०० हून अधिक सिमकार्डचे विश्लेषण; ७३ सायबर गुन्ह्यांशी संबंध उघड

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: सायबर फसवणुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या बेकायदा ‘सिम बॉक्स’ यंत्रणेविरोधात केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) मोठी कारवाई केली आहे. बिहारमधील वैशाली आणि ओडिशातील जगतसिंगपूर जिल्ह्यातील १० ठिकाणी छापे टाकून सीबीआयने एअरटेलच्या महुआ, वैशाली येथील क्षेत्रीय वितरकाला अटक केली.

मोठ्या प्रमाणात सिमकार्ड बनावट पद्धतीने जारी करून ती बेकायदा सिम बॉक्सच्या माध्यमातून सायबर फसवणुकीसाठी उपलब्ध करून दिल्याचा त्याच्यावर आरोप आहे.

१,३०० सिमकार्ड्‌सचा माग काढला

बिहारच्या सुपौल जिल्ह्यात मागील वर्षी बेकायदा सिम बॉक्स यंत्रणा उघडकीस आली होती. त्यानंतर हे प्रकरण सीबीआयकडे वर्ग करण्यात आले. ज्या घरातून सिम बॉक्स चालवला जात होता, तेथे तब्बल १,३०० हून अधिक सिमकार्ड्‌स आढळून आले.

या सिमकार्डशी संबंधित माहितीचे विश्लेषण केले असता, ही यंत्रणा देशभरातील किमान ७३ सायबर गुन्ह्यांशी जोडलेली असल्याचे निष्पन्न झाले. त्यात ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाने केली जाणारी फसवणूकही समाविष्ट आहे.

यातील बहुतांश सिमकार्ड बिहार आणि ओडिशातून जारी झाल्याचे आढळले. अटक केलेल्या एअरटेल वितरकाने वैशाली जिल्ह्यातील डझनभराहून अधिक सिमकार्ड विक्री केंद्रांच्या ओळखपत्रांचा गैरवापर करून ७०० हून अधिक सिमकार्ड जारी केल्याचे समोर आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT