MLA name on car Pudhari
मुंबई

MLA name on car: आमदाराचे नाव, लोगो कारवर लावणे महागात

पोलिसांच्या माहितीनुसार, नाकाबंदी दरम्यान गाडीची तपासणी करताना संबंधित व्यक्तीच्या कारवर आमदाराचे नाव तसेच पक्षाचा लोगो असलेले स्टिकर आढळून आले.

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: आमदाराचे नाव आणि पक्षाचा लोगो कारवर लावल्याप्रकरणी कार मालकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पाळीव प्राण्यांचे दुकान चालविणाऱ्या २९ वर्षीय व्यक्तीने कारवर आमदाराचे नाव आणि पक्षाचे चिन्ह असलेले स्टिकर लावून त्याचा गैरवापर केल्याचा आरोप आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, नाकाबंदी दरम्यान गाडीची तपासणी करताना संबंधित व्यक्तीच्या कारवर आमदाराचे नाव तसेच पक्षाचा लोगो असलेले स्टिकर आढळून आले. या स्टिकरचा वापर करण्यासाठी संबंधित आमदाराची परवानगी घेतली होती का, याबाबत पोलिसांकडून चौकशी केली असता, तो आमदारांना साधा ओळखत नसल्याचे पोलिसांना समजले.

आमदाराचे नाव आणि पक्षाचे चिन्ह कारवर लावण्यामागे नेमका उद्देश काय होता, याचा तपास पोलीस करीत आहेत. या माध्यमातून आपण आमदारांशी संबंधित असल्याचे भासवून कोणावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला होता का, याचीही पडताळणी केली जात आहे.

याबाबत पोलिसांनी तक्रारीच्या आधारे संबंधित व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, कारवरील स्टिकर आणि त्याच्या वापराबाबत अधिक माहिती घेतली जात आहे. तपासातून या प्रकारामागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT