मुंबई

Maharashtra MLC Election : भाजपकडून विधानपरिषदेसाठी उमेदवार जाहीर

मोहन कारंडे

पुढारी ऑनलाईन डेस्क : लोकसभा निवडणुकीत बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या मनसेला भाजपने विधान परिषद निवडणुकीत आव्हान दिले आहे. भाजप विधानपरिषदेच्या तीन जागा लढविणार आहे. भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीने महाराष्ट्रातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज तीन उमेदवारांची नावे जाहीर केली.

कोकण विभाग पदवीधर मतदारसंघातून निरंजन डावखरे हे निवडणूक लढवणार आहेत. मुंबई पदवीधर मतदारसंघातून किरण रवींद्र शेलार हे उमेदवार असणार आहेत. तर मुंबई शिक्षक मतदारसंघातून शिवनाथ दराडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. या निवडणुकीसाठी २६ जून रोजी मतदान होणार असून १ जुलै रोजी निकाल जाहीर होणार आहे.

दरम्यान, कोकण विभाग पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) याआधीच अभिजित पानसे यांच्या उमेदवारीची घोषणा केली आहे.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT