Admission Pudhari
मुंबई

B Pharmacy Admission 2026: बीफार्मसी, फार्मडी प्रवेश प्रक्रिया सुरू!

एनआयओएसच्या विद्यार्थ्यांना पहिल्यांदाच बी. फार्मसीची संधी यावर्षी देण्यात आली आहे.

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: राज्यातील औषधनिर्माणशास्त्र शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची असलेल्या बीफार्मसी आणि फार्म-डी या पदवी अभ्यासक्रमांच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेला शुक्रवारपासून सुरुवात झाली आहे. एनआयओएसच्या विद्यार्थ्यांना पहिल्यांदाच बी. फार्मसीची संधी यावर्षी देण्यात आली आहे.

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) कक्षाने शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी चार वर्षांच्या पूर्णवेळ बी. फार्मसी आणि सहा वर्षांच्या पूर्णवेळ फार्म-डी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशाची अधिसूचना जाहीर केली आहे.

ऑनलाइन प्रवेश नोंदणीची अंतिम मुदत १० ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत निश्चित करण्यात आली असून, त्यानंतर कागदपत्र पडताळणी, गुणवत्ता यादी आणि प्रवेश फेऱ्यांची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

यंदाच्या प्रवेश प्रक्रियेत राष्ट्रीय मुक्त विद्यालय शिक्षण संस्था (एनआयओएस) मधून बारावी विज्ञान (पीसीएम किंवा पीसीबी) उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रथमच बी. फार्मसी अभ्यासक्रमासाठी पात्रता देण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT