Visakha Raut Corporator: मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेविका विशाखा राऊत यांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. ठाकरे गटाच्या राऊत यांची नगरसेवक पद रद्द करण्याविरोधात दाखल केलेली याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.
पालघरच्या जात पडताळणी समितीने विशाखा राऊथ यांचे ओबीसी जात प्रमाणपत्र अवैध ठरवले होते. त्यानंतर त्यांचे नगरसेवकपद धोक्यात आले होते. या निर्णयाविरूद्ध विशाखा राऊत यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र तिथं देखील त्यांना दिलासा मिळालेला नाही. कोर्टाने त्यांची याचिका फेटाळून लावली आहे.
जात पडताळणी समितीच्या अहवालानंतर मुंबई महानगर पालिकेने राज्य सरकारला पत्र लिहित नगरसेवक पद रद्द झाल्याच जाहीर करायला सांगितलं होत. मात्र पालिकेच्या या पत्रव्यवहातला विशाखा राऊत यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिल होतं.
विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद रद्दची घोषणा सभागृहात लवकरच होणार आहे. पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी नगरविकास विभागाला पत्राद्वारे याची माहिती दिली आहे. विशाखा राऊत यांना पुढील ६ वर्षे नगरसेवक पदाची निवडणूक लढवता येणार नाहीये. असा आयुक्तांच्या या पत्रात उल्लेख आहे.
दरम्यान, आता विशाखा राऊत यांच्या जागी कोणाची नगरसेवकपदासाठी वर्णी लागणार याची उत्सुकता सर्वांना लागून राहिली आहे. सदा सरवणकर हे प्रिया सरवणकर यांच्यासाठी प्रयत्नशील असल्याचे दिसले होते. त्यांनी एकनाथ शिंदे यांची देखील भेट घेतली होती.