प्रकाश साबळे
मुंबई: मुंबई महानगरपालिकेतील घनकचरा व्यवस्थापन विभागातील सफाई कामगारांसाठी असलेल्या आश्रय योजनातंर्गत महानगरपालिका सुमारे १२ हजार घरे बांधणार आहे. या योजनेतील पहिल्या टप्प्यातील ३ हजार १०७ सदनिका बांधून तयार झाल्या असून त्याचे लवकरच वाटप सुरु होणार आहे.
या सर्व सदनिका आता आधुनिक सुविधा युक्त ३०० चौरस फुटांची नवीन घरे असतील. अशी माहिती पालिका सूत्रांनी दिली मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातील सफाई कामगारांच्या वसाहतीचा पुनर्विकास करण्याकरिता आर्थिक बजेटमध्ये विशेष तरतूद केली आहे. यानुसार जुन्या आणि धोकादायक झालेल्या वसाहतीचा पुनर्विकास करणे, नवीन वसाहत उभारणे आहे.
मुंबईतील २४ वाॅर्डांत आश्रय योजनातंर्गत राजवडकर स्ट्रीट, सरदार नगर, रावली कॅम्प, कल्पक, यारी रोड, ए.बी.नायर रोड, मिठा नगर, आकुर्ली रोड, बांभई नाका, चिराग नगर, एन.एम.जोशी मार्ग, प्रगती नगर, जे.पी.नगर, वामनवाडी आदी ठिकाणी ३ हजार १०७ सदनिकांचे काम पूर्ण झाले असून सन २०२७ च्या अखेरीस या सदनिकांचे सफाई कामगारांना वितरण करण्यात येणार आहे.
एनओसीमुळे या ठिकाणी कामे रखडली
महानगरपालिकेच्या आश्रय योजनेतील फेस -२ प्रकल्पातील दादर येथील गौतम नगर, फेस, हसनाबाद लेन, देवनार ट्राझिट कॅम्प, कुर्लातील लाॅयन्स गार्डन आदी ठिकाणी वेगवेगळ्या एनओसी न मिळाल्याने सदर प्रकल्पाची कामे थांबली आहेत. यात गौतम नगर -५७७, हसनाबाद लेन - ७४३ आणि देवनार ट्राझिट कॅम्प - ४२४ असे एकूण १ हजार ७४४ सदनिकांचे काम रखडले आहे.
सन २०२६ अखेरीस उपलब्ध होणारी घरे
राजवडकर स्ट्रीट, (ए.वाॅर्ड) १४०
सरदार नगर, (एफ.नार्थ) ११२
रावली कॅम्प, (एफ.नाॅर्थ) १६०
कल्पक, (एफ.नाॅर्थ) १४४
यारी रोड, (के.पश्चिम) २७४
ए.बी.नायर रोड, (के.पश्चिम) १४१
मिठा नगर, (पी.नाॅर्थ) ४५५
आकुर्ली रोड, (आर.दक्षिण) २०४
बांभई नाका, (आर.मध्य) ५५
चिराग नगर, (एन वाॅर्ड) ११५
एन.एम.जोशी मार्ग, (ई वाॅर्ड) ८२
प्रगती नगर, (पी.साऊंथ) ८२१
जे.पी.नगर, (पी.साऊंथ) २२०
वामनवाडी, (एम.पश्चिम) १८४