BMC Fixed Deposit Funds Pudhari
मुंबई

BMC Fixed Deposit Funds: विकासकामांसाठी मुंबई महापालिका मुदत ठेवी मोडणार

अडीच लाख कोटींच्या प्रकल्पांसाठी निधी; गुंतवणुकीतून 272 कोटी व्याजही मिळणार

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : शहरात सुरू असलेल्या विकासकामांसाठी मुंबई महापालिका मुदत ठेवी मोडून खर्च भागवणार आहे. तर दुसरीकडे विविध बँकांमध्ये मुदत ठेवींच्या रूपाने गुंतवणूकही करण्यात येणार आहे. महापालिकेने अखेरची 3,829 कोटी रुपयाची गुंतवणूक ऑक्टोबर व नोव्हेंबर 2025 मध्ये केली आहे. यातून 272 कोटी रुपयांचे व्याज मिळणार आहे.

मुंबई महानगरपालिकेतर्फे शहरात सुमारे 2 लाख 50 हजार कोटी रुपयांची कामे सुरू आहेत. त्यामुळे या कामांसाठी लागणारा निधी महापालिकेच्या तिजोरीत शिल्लक नाही. यासाठी गेल्या काही वर्षापासून विविध बँकांमध्ये ठेवण्यात आलेल्या मुदत ठेवी मोडण्यात येत आहेत. येणाऱ्या आर्थिक वर्षात 14 हजार 295 रुपयाच्या मुदत ठेवी मोडण्यात येणार आहेत. मुदत ठेवी मोडत असताना महापालिकेच्या वतीने दरवर्षी सरासरी सात ते आठ हजाराची गुंतवणूक केली जाते. ज्या कामांसाठी तरतूद करण्यात आलेल्या निधी पूर्णपणे संपवू शकणार नाही अशा निधीतील काही रक्कम मुदत ठेवीच्या रूपाने बँकेत ठेवण्यात येते. त्यामुळे या गुंतवणुकीतून महापालिकेला करोडो रुपयांचे व्याजही मिळत आहे.

ऑक्टोबर व नोव्हेंबर 2025 मध्ये महापालिकेने शेवटची मुदत ठेवीच्या रूपाने विविध बँकांमध्ये गुंतवणूक केली. यात स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, एचडीएफसी बँक, इंडियन बँक आदींचा समावेश आहे. या बँका मुंबई महापालिकेला सुमारे 6.1 टक्के ते 6.70

टक्के पर्यंत व्याज देते. ऑक्टोबर महिन्यात मुंबई महानगरपालिकेने 1,736 कोटी 30 लाख रुपयांची गुंतवणूक केली. यातून महानगरपालिकेला 125 कोटी 89 लाख रुपये इतके व्याज मिळणार आहे. नोव्हेंबर मध्ये 2,083 कोटी 50 लाख रुपयांची गुंतवणूक करण्यात आली यातून 146 कोटी 95 लाख रुपये व्याज मिळणार आहे.

पुढील आर्थिक वर्षातही गुंतवणूक करणार

मुंबई महापालिकेने मुदत ठेवी मोडण्याचा निर्णय घेतला असला तरी 2026-27 या आर्थिक वर्षातही विविध बँकांत मुदत ठेवीच्या रूपाने गुंतवणूक करणार आहे. त्यामुळे विविध बँकांमध्ये असलेल्या महापालिकेच्या ठेवीतून 2,572 कोटी रुपये मिळणार असल्याचे महानगरपालिकेकडून सांगण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT