मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभागांची हद्द निश्चित करण्यात आली आहे. नागरिकांच्या सूचना व हरकती विचारात घेऊन 227 प्रभागांची अंतिम हद्द सोमवार 6 ऑक्टोबरला प्रसिद्ध करण्यात आली. त्यामुळे निवडणुकीचा पहिला टप्पा आता पूर्ण झाला आहे.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीची तयारी महापालिका निवडणूक विभागाने जून 2025 पासून सुरुवात केली होती. पहिल्या टप्प्यात मुंबईतील 227 प्रभागांची हद्द निश्चित करण्याचा कार्यक्रम हाती घेतला. प्रभाग पुनर्रचनेचा आराखडा तयार केल्यानंतर तो आराखडा नागरिकांच्या हरकती सूचनांसाठी प्रसिद्ध करण्यात आला. त्यानुसार 4 सप्टेंबरपर्यंत हरकती सूचना नोंदवण्याची अंतिम तारीख देण्यात आली होती. यावेळी 488 जणांनी आपल्या हरकती नोंदवल्या होत्या. याची सुनावणी मुंबईच्या 227 प्रभागांची हद्द निश्चित
10 ते 12 सप्टेंबर या तीन दिवसात घेण्यात आली. प्रभाग हद्द निश्चित करताना स्पष्टपणे कळेल असे नकाशामध्ये मार्किंग करण्यात आलेले नाही. त्यामुळे अनेकांमध्ये संभ्रम असून तो दूर करावा अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली. उदाहरणार्थ नाल्यांची दर्शवलेली हद्द नकाशामध्ये कुठे दिसून येत नाही. काही प्रभागात मतदार जास्त तर काही प्रभागात कमी मतदार होती. नागरिकांनी नोंदवलेल्या या सूचना व हरकतींचा विचार करून मुंबई महापालिकेने निवडणूक आयोगाच्या परवानगीने प्रभाग पुनर्रचनेचा अंतिम आराखडा प्रसिद्ध केला आहे.
प्रभात पुनर्रचना अंतिम झाल्यामुळे आता प्रत्येक प्रभागातील मतदार यादी अंतिम करण्यात येणार आहे. त्यानंतर महापौर पदासाठी आरक्षण काढले जाणार आहे. तर ऑक्टोंबर अखेर अथवा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात प्रभात आरक्षणाची सोडत काढली जाणार असल्याचे एका वरिष्ठ निवडणूक अधिकार्यांकडून सांगण्यात आले.