BMC  Pudhari Photo
मुंबई

BMC Commissioner : पालिका आयुक्तपदासाठी आता ‌‘तिघीं‌’ची चर्चा !

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे आघाडीवर

पुढारी वृत्तसेवा

नवी मुंबई: राजेंद्र पाटील

मुंबई महानगरपालिकेचे विद्यमान आयुक्त भूषण गगराणी 31 मार्च रोजी सेवानिवृत्त होत आहेत. या पदासाठी आता तीन ज्येष्ठ महिला सनदी अधिकाऱ्यांच्या नावांची चर्चा असून त्यात मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे आघाडीवर असल्याचे समजते.

गेल्या सहा महिन्यापासून मुंबई पालिकेचा नवा आयुक्त कोण, हा प्रश्न चर्चेत आहे. आतापर्यंत सहा वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांची नावे या चर्चेत जोडली गेली. एमएमआरडीएचे आयुक्त संजय मुखर्जी, म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल, गृह निर्माणचे अतिरिक्त मुख्य सचिव असीम गुप्ता ही नावे आधी घेतली जात होती.

मार्च महिन्याच्या उत्तरार्धात मात्र अतिरिक्त मुख्य सचिव व्ही. राधा, अश्विनी भिडे आणि अतिरिक्त गृह सचिव मनीषा म्हैसकर-पाटणकर या तिघींची नावे पुढे आली. त्यातही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्वकांक्षी प्रकल्प म्हणून ओळखली जाणारी मुंबई मेट्रो गतीमान करण्याचे श्रेय ज्यांना खुद्द मुख्यमंत्र्यांनी जाहीरपणे दिले, त्या अश्विनी भिडे यांचे नाव सर्वात पुढे आहे, असे सुत्रांचे म्हणणे आहे.

अश्विनी भिडे या 1995 च्या बॅचच्या महाराष्ट्र केडरच्या आयएएस अधिकारी आहेत. त्या मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या (एमएमआरसी) व्यवस्थापकीय संचालक म्हणून विशेषतः मोठ्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचे नेतृत्व करण्यासाठी ओळखल्या जातात. मुंबईच्या ॲक्वा लाईनच्या (मेट्रो लाईन 3) विकासात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT