पुढारी ऑनलाईन डेस्क : महायुती सरकारमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखऱ बावनकुळे यांची मंत्रिपदी वर्णी लागली आहे. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते ?, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. नव्या प्रदेशाध्यक्षांची निवड मार्चमध्ये केली जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. तत्पूर्वी बुथ प्रमुख, तालुका प्रमुख व जिल्हा प्रमुखांच्या निवडी होणार आहेत. त्यानंतर प्रदेशाध्यक्षांची निवड केली जाणार आहे. (BJP Maharashtra)
जानेवारीत सदस्य नोंदणी, तर फेब्रुवारी महिन्यात बुथ प्रमुख, तालुका प्रमुख व जिल्हाध्यक्ष निवडी होणार आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष निवडीसाठी मार्च महिन्याचा मुहूर्त निघाला आहे. (BJP Maharashtra)
१ ते २० जानेवारीपर्यंत भाजप राबवणार सदस्य नोंदणी अभियान
२० ते २८ जानेवारी दरम्यान तब्बल ५ लाख अॅक्टीव्ह सदस्य तयार करणार
१ ते १० फेब्रुवारी दरम्यान १ लाख बुथ प्रमुखांची निवड केली जाणार
भाजपकडून १० ते २० फेब्रुवारी दरम्यान राज्यात ७०८ तालुका प्रमुखांची निवड केली जाणार
२० ते २८ फेब्रुवारी दरम्यान ७८ जिल्हा प्रमुख ही निवडले जाणार
१५ मार्चपर्यंत भाजपला मिळणार नवा प्रदेशाध्यक्ष (BJP Maharashtra)
भाजपकडून प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना मंत्रिपदाची संधी देण्यात आल्याने ते आता लवकरच प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देणार आहेत. त्यांच्या जागी मुख्यमंत्री फडणवीस यांचे विश्वासू नेते रवींद्र चव्हाण हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून समोर आली आहे. ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली विधानसभा मतदारसंघातून रवींद्र चव्हाण हे निवडून आले आहेत. महायुतीच्या आधीच्या सरकारमध्ये ते मंत्री होते. 2029 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याचे टार्गेट आहे. (BJP Maharashtra)