रत्नागिरी : मी भाजप, शिंदेसेनेच्या वाटेवर असल्याच्या अफवाच : साळवी

Rajan Salvi: हा निष्ठावंत सैनिक बाळासाहेबांचाच राहणार यात शंका नाही
Rajan Salvi Statement
राजन साळवीfile photo
Published on
Updated on

रत्नागिरी : विधानसभेला झालेल्या पराभवाची सल माझ्यासह मतदार संघातील कार्यकर्त्यांना आहे. भविष्यातील शिवसेनेचे मार्गक्रमण आम्ही करतोय. मी भाजपा, शिंदे सेनेच्या वाटेवर असल्याच्या अफवा असल्याचे माजी आ. व उपनेते राजन साळवी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. हा निष्ठावंत सैनिक बाळासाहेबांचाच राहणार यात शंका नसल्याचेही त्यांनी सांगितले.

पक्षात येणार्‍या कार्यकर्ते व पदाधिकार्‍यांचे स्वागत करणे हे प्रत्यक्ष पक्षप्रमुखाचे काम असते. त्या भावनेतून दोन्ही पक्षांतील वरिष्ठ यावर चर्चा करीत असतील. परंतु, मी यापूर्वी पक्षासाठी संघटन बांधताना केलेले कार्य अनेकांनी पाहिलेले आहे. त्यावरुन अनेकजणांचे मत बनले असेल, अशी भूमिका राजन साळवी यांनी व्यक्त केली.

मतदार संघातील कार्यकर्त्यांच्या भावना अनेक भावना आहेत. त्यांच्याशी चर्चा होत असून, त्यावरुन पुढे कशा पद्धतीने मार्गक्रमण करायचे यावर निर्णय घेतला जाईल असेही माजी आ. साळवी यांनी सांगितले.

पराभवानंतर उद्धव ठाकरे यांनी बैठक घेतली होती. त्यानंतर कारणमीमांसा करण्यात आली. आपल्याशी चर्चा केली. त्यानुसार आपण मार्गक्रमण करीत आहोत. आपल्याशी कोणीही संपर्क साधलेला नसल्याचे त्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news