Manda Mhatre heart attack
मुंबई: बेलापूर विधानसभा मतदारसंघाच्या भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे यांना काल रात्री हृदयविकाराचा सौम्य झटका आला. प्रकृती बिघडल्याने त्यांना तातडीने नवी मुंबईतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर मध्यरात्री यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली आहे. सध्या त्यांची प्रकृती उत्तम असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
सध्या विधानसभेचे अधिवेशन सुरू असून, कामकाजात व्यस्त असतानाच आमदार मंदा म्हात्रे यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. छातीत वेदना आणि अस्वस्थता जाणवू लागल्याने त्यांनी कोणताही विलंब न करता थेट नवी मुंबईतील बेलापूर येथील अपोलो रुग्णालय गाठले.
रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांची प्राथमिक तपासणी केली असता त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे निदान झाले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून डॉक्टरांच्या पथकाने मध्यरात्रीच त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली.
घड्याळ, साडी व आता गाडीवर लावण्यात आलेले लाल निळे दिवे, यावरून झालेल्या टीकेमुळे महापौर रितू तावडे चांगल्याच संतापल्या आहेत. नागरी प्रश्नांवर चर्चा करण्याऐवजी अशा किरकोळ मुद्द्यांवर राजकारण करणाऱ्या शिवसेना ठाकरे गटाला मुंबईकरांनी म्हणूनच विरोधी बाकावर बसविले, अशी संतप्त प्रतिक्रिया हा महापौरांनी व्यक्त केली.