मुंबई : बिहार विधानसभा निवडणूक निकाल लागत असताना राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे वातावरण तापले आहे. राज्यात महायुती 50 टक्के ठिकाणी युती करेल तर 50 टक्के ठिकाणी स्वतंत्र लढणार असल्याचे समजते. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारी करत आहेत. यामध्ये महायुतीची कुठे कुठे युती होईल आणि कुठे होणार नाही याची उत्सुकता राजकीय वर्तुळात आहे.
या पार्श्वभूमीवर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्याण-डोंबिवलीमध्ये महायुतीची युती फुटणार तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातही युती नसणार आहे. मात्र रत्नागिरी, धाराशिव या जिल्ह्यांमध्ये युती होणार आहे. काही ठिकाणी अजूनही युतीसंदर्भात चर्चा सुरू असून महत्त्वाच्या ठिकाणी शेवटच्या क्षणी निर्णय घेतला जाऊ शकतो.