Ganpati Pudhari File Photo
मुंबई

Bhuleshwar Ganpati Incident: गणपती आगमन मिरवणुकीत आता जल्लोष नको! भुलेश्वर दुर्घटनेनंतर समन्वय समितीचा मोठा निर्णय

भुलेश्वर राजा गणपती आगमन दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाल्यानंतर समन्वय समितीने दुखवटा जाहीर केला. आगामी मिरवणुकांत जल्लोष टाळण्याचे आवाहन.

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: शनिवारी रात्री भुलेश्वर राजा गणपती आगमनाच्या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाल्यानंतर बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने दुखवटा जाहीर केला असून, आगामी आगमन मिरवणुकीत वाजंत्री आणि इतर कोणत्याही प्रकारचा जल्लोष करू नये, असे आवाहन केले आहे.

आगमन आणि विसर्जन साेहळ्यात अशा घटना टाळण्यासाठी मंडळांमधील सुरक्षा व्‍यवस्था आणि इतर उपाययोजनांसंदर्भात समन्वय समितीची तातडीने बैठक घेण्यात येणार असल्याचे समितीचे अध्यक्ष ॲड. नरेश दहिबावकर यांनी सांगितले.

भुलेश्वर राजा मंडळातील मृत व्‍यक्तींच्या वारसांना तसेच जखमींना शासनाने आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी समितीने केली असून, शासनाशी या संदर्भात लेखी पत्रव्‍यवहार करण्यात येणार असल्याचे ॲड. दहिबावकर यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT