Bhandup Minor Murder Pudhari
मुंबई

Bhandup Minor Murder: भांडुपमध्ये थरारक प्रकार! १४ वर्षीय सिद्धार्थ लोंढेची मित्रांकडून मारहाण करून हत्या

पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह विहार तलावात फेकला; तीन अल्पवयीन मुलांना पोलिसांकडून ताब्यात

पुढारी वृत्तसेवा

मुलुंड : भांडुप परिसरात तीन अल्पवयीन शाळकरी मुलांनी सिद्धार्थ अजय लोंढे (वय 14) या त्यांच्या वर्गमित्राची मारहाण करून हत्या केली आणि पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह विहार तलावात फेकून दिला.

या धक्कादायक हत्येप्रकरणी भांडुप पोलिसांनी 14 आणि 15 वर्षांच्या या तीन मुलांना ताब्यात घेतले असून, त्यांना डोंगरी येथील बाल निरीक्षण गृहात ठेवण्यात आले आहे.

सिद्धार्थ भांडुप पश्चिम येथील तुळशेतपाडा भागात कुटुंबासोबत राहात होता. 22 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास तो घराबाहेर खेळायला जात असल्याचे सांगून निघाला. मात्र रात्रीपर्यंत परतला नाही. कुटुंबीयांनी शोध घेतला,

पण काहीच माहिती मिळाली नाही. सिद्धार्थच्या आईने मग पोलिसांकडे मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. मुलगा अल्पवयीन असल्याने पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. दुसऱ्या दिवशी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास विहार तलावात त्याचा मृतदेह आढळला. प्राथमिक अहवालात डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचे नमूद करण्यात आले.

सिद्धार्थ शेवटचा त्याच परिसरातील एका मित्रासोबत दिसला होता. ज्याने ही माहिती दिली. त्यानेच गुन्ह्याची कबुली दिली आणि आणखी दोन मित्रांचा सहभाग असल्याचे सांगितले. हत्येसाठी वापरलेली लाकडी काठी पोलिसांनी जप्त केली आहे. केवळ रागातून हा प्रकार घडल्याचे समजते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT