Mumbai Theft Pudhari File Photo
मुंबई

Mumbai Theft: बेस्टच्या शिवाजीनगर डेपोत सराईत चोरांचा वावर; बस चार्जिंग गन पॉईंटची चोरबाजारात विक्री

त्यामुळे बेस्ट आगारांच्या सुरक्षितेबाबत प्रश्नचिन्ह होत आहे.

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: बेस्ट्या शिवाजीनगर बस डेपोत सराईत चोरांचा वावर वाढला आहे. या चोरांनी संघटितपणे डेपोतील 10 चार्जिंग गन पॉईंटची चोरी करून चोरबाजारात त्या विकल्या आहेत. बेस्ट समितीच्या बैठकीत याबाबत हरकतीचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. त्यामुळे बेस्ट आगारांच्या सुरक्षितेबाबत प्रश्नचिन्ह होत आहे.

गोवंडी येथील शिवाजी नगर आगारात बस आणि चार्जिंग सेवेची देखभाल टाटा मोटर्स कंपनीकडे आहे. मात्र येथील आगाराच्या संरक्षण भिंतीवरून काही तरुण आत शिरतात आणि चार्जिंग पॉईंट चोरून नेतात. त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला असता संघटितपणे दगडफेक करतात. वीज प्रवाह सुरू असताना चार्जिंग पॉईंट चोरणे हे सामान्य तरुणाचे काम नसून सराईत चोरांचा संघटितपणे सुरू असलेला कारभार असल्याची माहिती बेस्ट समितीचे सदस्य रमाकांत गुप्ता यांनी दिली.

चोरी गेलेल्या एका चार्जिंग पॉईंटची किंमत दीड लाखांपर्यत आहे. चोरलेले पाँईंट चोर बाजारात विकले जातात. दगडफेकीसाठी 100 ते 150 रूपये दिले जातात अशी माहिती येथे भेट दिल्यावर समजली असेही गुप्ता यांनी सांगितले.

दरम्यान,शिवाजीनगर आगाराची सुरक्षा केवळ 12 ते 13 रक्षकांच्या खांद्यावर आहे. बेस्ट दक्षता समितीने सुरक्षा रक्षक वाढ करण्यासाठी पत्र दिले आहे. याबाबत येत्या 15 दिवसात ठोक कारवाई करणार असल्याचे बेस्ट उपक्रमाच्या महाव्यवस्थापक सोनिया सेठी यांची सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT