BEST Auto Taxi Service Mumbai Pudhari
मुंबई

BEST Auto Taxi Service Mumbai: बेस्टच्या रिक्षा-टॅक्सी धावणार; प्रशासन अनुकूल, सर्वेक्षणानंतर निर्णय

आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी बेस्ट उपक्रमाच्या माध्यमातून ‘बेस्ट ऑटो’ आणि ‘बेस्ट टॅक्सी’ सेवा सुरू करण्याचा विचार आहे. सर्वेक्षणानंतर याबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: बेस्ट उपक्रमाची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी ओला उबरच्या धर्तीवर रिक्षा-टॅक्सी सेवा सुरू करण्यासाठी बेस्ट प्रशासन अनुकूल आहे. या संदर्भात सर्वेक्षण करून निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात बेस्टच्या रिक्षा-टॅक्सीही शहराच्या रस्त्यावर धावताना दिसतील.

बेस्ट उपक्रम सध्या आर्थिक चणचणीतून जात आहे. त्यामुळे बेस्टला स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी अनेक प्रयत्न सुरू आहे. बेस्टला आपल्या पारंपारिक पध्दतीत बदल करुन काळानुरुप बदलण्याची गरज असल्याचे मत सर्वपक्षीय नगरसेवकांनी व्यक्त केले.

बेस्ट उपक्रमाकडे मुंबईत प्रवासीवर्ग, बस आगार, बस स्थानके, वाहतूक व्यवस्थापनाचा अनुभव तसेच नागरिकांचा विश्वास यांचा मोठा आधार आहे. या अनुभवाचा उपयोग करुन बेस्टच्या माध्यमातून बेस्ट ऑटो, बेस्ट टॅक्सी या नावाने सेवा सुरू करणे आवश्यक असल्याचे मत सर्वपक्षीय नगरसेवकांनी व्यक्त केले.

भाडे तत्वावर रिक्षा-टॅक्सी सुरू करणे शक्य

रिक्षा टॅक्सी खरेदी करण्यासाठी बेस्टकडे पैसे नाहीत. मुंबई महानगरपालिकेकडून मिळणाऱ्या अनुदानातून नवीन बस खरेदी करण्यासह कर्मचाऱ्यांची देणी भागवण्यात येत आहेत. त्यामुळे ओला उबरच्या धर्तीवर भाडेतत्त्वावर रिक्षा व टॅक्सी सेवा सुरू करणे शक्य असल्याचे पालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याचे म्हणणे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT