BDD Chawl Redevelopment Pudhari
मुंबई

BDD Chawl Redevelopment: बीडीडी चाळवासीयांचे स्वप्न पूर्ण होणार! ५५७ रहिवाशांना ६ नोव्हेंबरला मिळणार नवी घरे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सदनिकांचे वितरण; पात्र रहिवाशांना ५०० चौरस फुटांची २ बीएचके घरे

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील ना. म. जोशी मार्ग-लोअर परळ येथील प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात पूर्ण झालेल्या ३ पुनर्वसन इमारतींतील एकूण ५५७ पात्र रहिवाशांना प्रातिनिधिक स्वरुपात सदनिकांचे वितरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर, नरीमन पॉईंट येथे ६ नोव्हेंबरला दुपारी १२ वाजता करण्यात येणार आहे.

पुनर्वसन इमारतींच्या ३ विंगमधील ५५७ सदनिकांच्या वितरण कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री व गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उपस्थित राहणार आहेत.

३ मजल्यांच्या ३२ चाळींमध्ये १६० चौरस फूट सदनिकेत २५६० रहिवासी वास्तव्यास होते. दोन ते तीन पिढ्यांपासून १६० चौरस फुटांच्या खोलीत राहणाऱ्या पात्र रहिवाशांना म्हाडामार्फत ५०० चौरस फूट चटई क्षेत्रफळाची २ बीएचके सदनिका मालकीने दिली जाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT