BArch CET Registration Last Date Pudhari
मुंबई

BArch CET Registration Last Date: आर्किटेक्चर प्रवेश नोंदणी २८ जुलैपर्यंत करता येणार

पात्र विद्यार्थ्यांनी मुदतवाढीचा लाभ घेऊन प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन सीईटी कक्षाने केले आहे.

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) कक्षाने बी. आर्किटेक्चर प्रथम वर्षाच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाइन नोंदणीची मुदत २८ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत वाढविली आहे. यापूर्वी ही मुदत २४ जुलैपर्यंत होती. पात्र विद्यार्थ्यांनी मुदतवाढीचा लाभ घेऊन प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन सीईटी कक्षाने केले आहे.

बी. आर्किटेक्चर प्रवेशासाठीची ऑनलाइन नोंदणी १४ जुलैपासून सुरू झाली होती. आतापर्यंत राज्यभरातून ६ हजार १६० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. प्रवेशासाठी अर्ज करताना विद्यार्थ्यांना आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावी लागणार आहेत.

कागदपत्र पडताळणीसाठी विद्यार्थ्यांना 'ई-स्क्रूटिनी' (ई-पडताळणी) किंवा 'फिजिकल स्क्रूटिनी' (प्रत्यक्ष पडताळणी) या दोन पर्यायांपैकी एकाची निवड करता येणार आहे. ई-स्क्रूटिनीची निवड केल्यास कागदपत्रांची पडताळणी ऑनलाइन होणार असून विद्यार्थ्यांना केंद्रावर जाण्याची आवश्यकता नाही.

मात्र, फिजिकल स्क्रूटिनीची निवड करणाऱ्या विद्यार्थ्यांना जवळच्या स्क्रूटिनी सेंटर किंवा फॅसिलिटेशन सेंटरमध्ये प्रत्यक्ष उपस्थित राहून कागदपत्रांची पडताळणी करावी लागणार आहे.

सुधारित वेळापत्रक

प्रवेश प्रक्रियेचे ऑनलाइन अर्ज नोंदणी व कागदपत्रे अपलोड - १४ ते २८ जुलै (सायं. ५ वाजेपर्यंत)

अर्ज पडताळणी व निश्चिती -१५ ते २९ जुलै (सायं. ५ वाजेपर्यंत)

तात्पुरती गुणवत्ता यादी - ३१ जुलै

तक्रारी नोंदविण्याचा कालावधी - १ ते ३ ऑगस्ट (सायं. ५ वाजेपर्यंत)

अंतिम गुणवत्ता यादी - ५ ऑगस्ट २०२६

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT