Mumbai Police: ड्रग्ज तस्करांवर मुंबई पोलिसांचा बडगा; ६ महिन्यांत १२ आरोपी वर्षासाठी स्थानबद्ध

यंदाच्या सहा महिन्यांत ड्रग्ज तस्करीत सक्रिय असलेल्या १२ सराईत आरोपींना पीआयटी-एनडीपीएस कायदा, १९८८ अंतर्गत एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले आहे.
Police
PolicePudhari
Published on
Updated on

मुंबई: मुंबईत अमली पदार्थांच्या तस्करीचे वाढते जाळे उद्ध्वस्त करण्यासाठी मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी कक्षाने कठोर मोहीम हाती घेतली आहे. यंदाच्या सहा महिन्यांत ड्रग्ज तस्करीत सक्रिय असलेल्या १२ सराईत आरोपींना पीआयटी-एनडीपीएस कायदा, १९८८ अंतर्गत एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले आहे.

या मालिकेतील ताज्या कारवाईत आझाद मैदान युनिटने उस्मान अब्दुल कादर शेख उर्फ सोनू (वय ३७) याला एक वर्षासाठी नाशिक मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध केले. त्याच्याविरुद्ध एनडीपीएस कायद्यांतर्गत चार गुन्हे दाखल असून दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतरही तो जामिनावर सुटून पुन्हा ड्रग्ज तस्करीत सक्रिय झाल्याचे तपासात स्पष्ट झाले.

Police
Mumbai Dams Full Water Stock: मुंबईवर जलकृपा! यंदा पाण्याची चिंता मिटली

मुंबई पोलिस आयुक्तांच्या शिफारशीनुसार महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने त्याच्याविरुद्ध पीआयटी अंतर्गत स्थानबद्धतेस मंजुरी दिली. अमली पदार्थ विरोधी कक्षाने यंदा जामिनावर सुटून पुन्हा गुन्हे करणाऱ्या ड्रग्ज तस्करांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे.

Police
Mahalaxmi Multimodal Connectivity Project: एकही झाड न तोडता उभारला देशातील पहिला ट्रॅव्हलेटरयुक्त पूल

केवळ गुन्हे दाखल करून न थांबता, सराईत तस्करांना एक वर्षासाठी कारागृहात स्थानबद्ध करून त्यांचे ड्रग्ज रॅकेट मोडून काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. २०२६ मधील ही १२ वी कारवाई असून, पुढील काळातही अशी मोहीम सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news