Bank Services Closed Pudhari
मुंबई

Bank Services Closed: २६ ते ३० सप्टेंबर बँकिंग सेवा बंद? सलग ५ दिवसांचा ब्रेक, जाणून घ्या कारण

Bank Strike September 26 To 30: पेन्शन सुधारणा, महागाई भत्त्याचे समान सूत्र, जुनी पेन्शन योजना आणि पाच दिवसांचा कामाचा आठवडा लागू करण्याच्या मागण्यांसाठी बँक कर्मचाऱ्यांनी २८ ते ३० सप्टेंबरदरम्यान संपाची हाक दिली आहे. त्यामुळे २६ ते ३० सप्टेंबरदरम्यान बँकिंग सेवेवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: पेन्शनमध्ये सुधारणा, निवृत्ती वेतनधारकांसाठी महागाई भत्त्याचे एकसमान सूत्र, राष्ट्रीय पेन्शन प्रणालीऐवजी जुनी पेन्शन योजना पुन्हा सुरू करावी यासह इतर मागण्यांसाठी बँक कर्मचाऱ्यांनी २८ ते ३० सप्टेंबरदरम्यान संपाची हाक दिली आहे.

त्याआधी शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्या आहेत. त्यामुळे २६ सप्टेंबर ते ३० सप्टेंबरदरम्यान सलग पाच दिवस बँकिंग सेवा बंद राहणार आहेत.

बँक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या जवळपास ९० टक्‍के सदस्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सात युनियनची प्रमुख संघटना असलेल्या ‘युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स’ने संपाची हाक दिली आहे.

२०२४ च्या वेतन करारापासून प्रलंबित असलेला पाच दिवसांचा कामाचा आठवडा तत्काळ लागू करावा, अशी युनियनची मुख्य मागणी आहे. याशिवाय, कामगिरीवर आधारित प्रोत्साहन भत्त्यात एकतर्फी बदल करण्यात आल्याचा आरोप करत त्यात सुधारणा करण्याची मागणी आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT