Bala Nandgaonkar On Raj Thackeray Post pudhari photo
मुंबई

Bala Nandgaonkar On Raj Thackeray Post: राज ठाकरेंच्या लवचिकतेचा अर्थ काय... मुरली देवरांचे उदाहरण देऊन नांदगावकर स्पष्टच बोलले!

बाळा नांदगावकरांनी इतिहासात बाळासाहेबांनी कशी लवचिक भूमिका घेतली होती हे उदाहरण देऊनच सांगितलं.

Anirudha Sankpal

Bala Nandgaonkar On Raj Thackeray Flexible Statement: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मशताब्दीदिनी ट्विट करून आदरांजली वाहिली. मात्र ही आदरांजली वाहताना त्यांनी बाळासाहेबांनी जशी लवचिकता दाखवली तशी लवचिकता दाखवण्याचे संकेत दिले. यामुळे आधीच महापौर निवडीवरून तापलेले राजकीय वातावरण अजूनच तापले आहे. दरम्यान, मनसे नेते बाळा नांदगावकर हे बाळासाहेबांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी शिवतीर्थावर आले होते. त्यावेळी त्यांनी राज ठाकरेंच्या या वक्तव्यावर भाष्य केलं.

बाळा नांदगावकर पत्रकारांशी बोलताना म्हणाले, 'बाळासाहेबांना जेवढा मराठी माणूस प्रिय तेवढा हिंदू देखील प्रीय होता. बाळासाहेबांनी दिलेली शिकवण घेऊन प्रामाणिकपणे काम केलं पाहिजे. पण परिणामांची परवा न करत काम केलं पाहिजे. बाळासाहेबांना मनाला पटणार आवडणारंच केलं पाहिजे.'

नांदगावकरांनी मुरली देवरांचे दिले उदाहरण

राज ठाकरेंच्या पोस्टवर नांदगावकरांनी, 'बाळासाहेबांनी मराठी माणसांच्या हितासाठी लवचिकता घेतली होती. मी देखील अशी लवचिकचा घेतली तर ती माझ्यासाठी नसेल अशी पोस्ट केली होती. त्याबाबत विचारलं असता बाळा नांदगावकर म्हणाले, 'बाळासाहेबांनी मुरली देवरांना महापौर बनायला मदत केली होती. बाळासाहेब जेवढे कठोर होते वेळप्रसंगी ते सॉफ्ट देखील व्हायचे. बाळासाहेबांची भूमिका ही त्यांच्या पक्षाच्या हिताची असायची त्याच्याही पुढे जाऊन ती मराठी माणसाच्या हिताची असायची.' असे वक्तव्य केले.

महाराष्ट्रात मराठी माणसांच्या अंगावर आलात तर..

ते पुढं म्हणाले 'बाबरीचा विषय आला त्यावेळी भाजपच्या सर्व लोकांनी हात वर केले होते. त्यावेळी कारसेवेत जर माझा शिवसैनिक असेल तर मला त्याचा गर्व आहे असं बोलले होते. बाळासाहेबांनी आपली भूमिका स्पष्टपणे अन् परखडपणे मांडली होती. मराठी माणसाच्या बाबतीत त्यांनी कधीच कॉम्प्रमाईज केलेलं नाही. त्यांची स्पष्ट भूमिका होती की मी महाराष्ट्रात मराठी आहे आणि देशात मी हिंदू आहे.'

नांदगावकर म्हणाले, 'महाराष्ट्रात मराठी माणसांच्या अंगावर आलात तर मी सोडणार नाही. अन् देशात हिंदूंच्या अंगावर आलात तरीदेखील सोडणार नाही अशी बाळासाहेबांची भूमिका होती तीच भूमिका राज ठाकरेंची देखील आहे.'

अशी भूमिका राज साहेब कधी कधी घेतात

लवचिकता शब्दाबद्दल बलोताना नांदगावकर म्हणाले, 'ज्यावेळी मराठी माणसाच्या हिताचा विषय येतो त्यावेळी थोडी लवचिक भूमिका घ्यावी लागते. अशा प्रकारची भूमिका राज साहेब कधी कधी घेतात. मला वाटतं की ती चुकीची नाही.

मुंबईत मराठी महापौर होणार असेल तर राज ठाकरे भाजपला समर्थन देऊ शकतात याबाबत विचारले असता नांदगावर यांनी याबाबतचा निर्णय घेण्यास दोन्ही भाऊ समर्थ आहेत. बाळासाहेबांचे शताब्दी वर्ष आहे आज शन्मुखानंद हॉलमध्ये दोघेही भेटणार आहेत. संबोधित करणार आहेत. त्यावेळी ते काय भूमिका घेतात याकडे तुमच्यासारखं आमचंही लक्ष आहे. ते जी भूमिका घेतील ती कार्यकर्ता म्हणून आम्हाला मान्य असेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT