Baba Siddiqui murder case file photo
मुंबई

Baba Siddiqui murder case : वाँटेड गँगस्टर अनमोल बिश्नोईच्‍या 'एनआयए'ने मुसक्या आवळल्‍या

अमेरिकेतून हद्दपार झाल्यानंतर दिल्ली विमानतळावर घेतले ताब्‍यात

पुढारी वृत्तसेवा

Baba Siddiqui murder case : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकीच्या हत्याप्रकरणी हवा असलेला वाँटेड गँगस्टर अनमोल बिश्नोई ( Anmol Bishnoi ) बुधवारी अमेरिकेतून हद्दपार झाल्यानंतर दिल्लीच्या आयजीआय विमानतळावर उतरला. राष्‍ट्रीय सुरक्षा संस्‍था (NIA) त्‍याला ताब्‍यात घेऊन औपचारिक प्रक्रिया पूर्ण केली. यानंतर त्‍याला पटियाला हाऊस कोर्टातील विशेष एनआयए कोर्टात हजर करण्यात आले.

विशेष एनआयए कोर्टात हजर

अनमोल बिश्नोई याच्या हद्दपारीच्या प्रक्रियेत एनआयएने समन्वय साधला होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनमोल हा अमेरिकेतून हद्दपार करण्यात येत असलेल्या सुमारे २०० "अवैध" स्थलांतरितांना घेऊन येणाऱ्या विशेष चार्टर्ड विमानाने आला असावा. याच विमानात पंजाबमधील इतर दोन फरारी गुंडही असण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. एनआयएने बुधवारी अनमोल बिश्नोई याला ताब्‍यात घेऊन औपचारिक प्रक्रिया पूर्ण केली. यानंतर त्‍याला पटियाला हाऊस कोर्टातील विशेष एनआयए कोर्टात हजर करण्यात आले.

अनमोल बिश्नोईला अमेरिकेतून हद्दपार

या संदर्भात 'टाईम्‍स ऑफ इंडिया'ने दिलेल्‍या वृत्तात म्‍हटलं आहे की, आज अमेरिकेतून सुमारे २०० बेकायदेशीर स्थलांतरितांना घेऊन एका विशेष चार्टर्ड विमान मुंबईत पोहचले. यामध्‍ये गुंड अनमोल बिश्नोई याचाही समावेश होते. अनमोल याला अमेरिकेतून हद्दपार करण्‍यात आले होते. दिवंगत बाबा सिद्दीकीचा मुलगा झीशान सिद्दीकी यांनी सांगितले की, यांसदर्भात अमेरिकेतील डिपार्टमेंट ऑफ होमलँड सिक्युरिटी (डीएचएस) कडून ईमेलद्वारे अधिकृत सूचना मिळाली आहे. या ईमेलमध्ये म्हटले आहे की, १८ नोव्हेंबर २०२५ रोजी अनमोल बिश्नोईला अमेरिकेतून हद्दपार केले आहे.

झीशान सिद्दीकी यांनी साधला होता अमेरिकन अधिकाऱ्यांशी संपर्क

अनमोलच्या त्याच्या ठावठिकाणाबद्दल मुंबई पोलिसांना कोणताही संपर्क झाला नसल्याने झीशान सिद्दीकी यांनी यापूर्वी अमेरिकन अधिकाऱ्यांशी संपर्क साधला होता. त्यानंतर त्‍याच्‍या हद्दपारीची पुष्टी झाली. अनमोलला गेल्या नोव्हेंबरमध्ये बेकायदेशीर प्रवेशासाठी अमेरिकेत अटक करण्यात आली होती. नंतर फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (FBI) या अमेरिकेची प्रमुख तपासणी आणि गुप्तचर संस्थेने त्‍याच्‍या आवाजाच्या नमुन्यांच्या जुळण्यांद्वारे त्याची ओळख पटवली. त्याला आयोवा येथील पोटावट्टामी काउंटी तुरुंगात ठेवण्यात आले होते. त्याने सीमापार गुन्हेगारी आणि कागदपत्रे नसलेल्या इमिग्रेशनसाठी ICE द्वारे चौकशी सुरू असताना आश्रय मागितला होता.

सलमान खानच्‍या घराबाहेर झालेल्‍या गोळीबाराची घेतली होती जबाबदारी

एप्रिल २०२४ मध्ये अभिनेता सलमान खानच्या निवासस्थानाबाहेर झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर अनमोल पुन्‍हा चर्चेत आला होता. एका फेसबुक अकाउंटने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. नंतर तपासकर्त्यांना अनमोल आणि शूटर विकी गुप्ता यांच्यातील कथित संभाषणाचे ऑडिओ रेकॉर्डिंग सापडले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT