Flight Price Pudhari
मुंबई

Flight Price: विमान इंधन दरात 114% वाढ; आता विमान प्रवासही महागणार

India flight ticket price increase:

पुढारी वृत्तसेवा

India airline fare hike news
मुंबई:
अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराण युद्घाच्या तडाख्यात जगभरातील विमान सेवा सापडली असतानाच केंद्र सरकारने विमान इंधनाच्या (एटीएफ) दरातही अभूतपूर्व वाढ केली आहे. परिणामी, भारतातील सर्वच विमान प्रवासाचे दर आता भडकण्याची चिन्हे असून, इंडिगोपासून त्याची सुरुवातही झाली आहे.

नॉन-शेड्युल, ॲड-हॉक आणि चार्टर्ड विमानांसाठी ‌‘एटीएफ‌’च्या किमतीत मोठी वाढ केली आहे. या श्रेणीसाठी ‌‘एटीएफ‌’ची किंमत प्रतिकिलोलिटर 1,10,703.08 रुपयांवरून थेट 2,07,341.22 रुपयांवर पोहोचली आहे, जी सुमारे 114.5 टक्के वाढ आहे.

दुसरीकडे, देशांतर्गत विमानांसाठी ‌‘एटीएफ‌’च्या दरात 8.5 टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. पेट्रोलियम मंत्रालयाने प्रसिद्धीपत्रकात 25 टक्के दरवाढीचा उल्लेख केला आहे; मात्र सध्याची 8.5 टक्के वाढ पुढे 25 टक्क्यांपर्यंत जाणार का, याबाबत स्पष्टीकरण दिलेले नाही.

इंडिगोचे भाडे वाढले

सरकारने एव्हिएशन टर्बाईन फ्युएल (एटीएफ) च्या किमती वाढवल्यानंतर इंडिगोने तत्काळ विमान भाड्यात वाढ जाहीर केली आहे. सुधारित इंधन दर अंतराप्रमाणे वेगवेगळे आहेत. 500 किलोमीटरपेक्षा कमी अंतरासाठी सर्वात कमी रु. 275, तर 2,000 किलोमीटरपेक्षा जास्त अंतरासाठी 950 रुपये भाडे असेल. सर्वाधिक बदल ग्रीस आणि तुर्कियेवगळता यूके आणि युरोपमधील ठिकाणांसाठी झाला असून, नवीन दर 10,000 रुपये आहे.इंडिगोने सांगितले की, हे नवीन भाडे गुरुवारी पहाटे 1 वाजल्यानंतर केलेल्या बुकिंगवर लागू होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT