मुंबई : अटल सेतू (मुंबई पारबंदर प्रकल्प) ते मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग जोङमार्गाच्या ७.३५ किलोमीटर लांबीच्या सहापदरी उन्नत मागचि ६७ टक्के भौतिक काम पूर्ण झाले आहे. हा मार्ग वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर दक्षिण मुंबई ते पुणे प्रवासाच्या वेळेत अंदाजे ६० ते २० मिनिटांची बचत होणे अपेक्षित आहे.
अटल सेतू कार्यान्वित झाल्यानंतर मुंबई आणि नवी मुंबई यांच्यातील प्रवास वेगवान झाला; मात्र पुणे, गोवा आणि जवाहरलाल नेहरू बंदराच्या दिशेने वाढणाऱ्या वाहनांच्या संख्येमुळे विद्यमान रस्ते जाळ्यावर, विशेषतः पनवेल मुख्य जंक्शन परिसरात, वाहतुकीचा अतिरिक्त ताण निर्माण होत आहे. या ठिकाणी अटल सेतूवरून येणारी वाहतूक प्रमुख महामार्गावरील वाहतुकीशी एकत्रित होते.
ही समस्या दूर करण्यासाठी एमएमआरडीए चिर्ले आणि पळस्पे विभागांतून स्वतंत्र सहापदरी उन्नत मार्ग विकसित करत आहे. या मार्गामुळे वाहतूक कोंडी असलेले प्रमुख जंक्शन टाळून मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर थेट प्रवेश करता येणार आहे. तसेच पनवेल मुख्य जंक्शनवरील अवलंबित्व कमी होईल.
हा मार्ग अटल सेतू आणि मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग यांच्यातील दळणवळणाचा एक महत्वपूर्ण अपूर्ण दुवा पूर्ण करणार आहे. त्यामुळे वाहतुकीचे व्यवस्थापन अधिक कार्यक्षम होऊन विद्यमान जंक्शनवरील ताण कमी होण्यास मदत होईल. स्वतंत्र पायाभूत सुविधा प्रकल्पांना परस्पर जोडून एकात्मिक प्रादेशिक वाहतूक जाळे निर्माण करणे, हा आमच्या नियोजनाचा मूलभूत दृष्टिकोन आहे. अखंड दळणवळण, प्रवासाच्या वेळेत बचत आणि अधिक सुलम संपर्क यांना नियोजन व अंमलबजावणीच्या केंद्रस्थानी ठेवणाऱ्या एमएमआरडीएच्या 'मुंबई इन ५९ मिनिट्स' या संकल्पनेच्या पूर्ततेच्या दिशेने हा प्रकल्प आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.
- डॉ. संजय मुखर्जी, महानगर आयुक्त, एमएमआरडीए