Ashok Kharat Case | नवरा-बायकोचा बुद्धिभेद करून खरातने उद्ध्वस्त केले शेकडो संसार 
मुंबई

Ashok Khart Case : लग्न करण्याचे आमिष दाखवत खरातने केले विवाहितेचे लैंगिक शोषण : संबधित पिडीता गर्भवती!

भोंदू अशोक खरातवर तिसरा गुन्हा सरकारवाडा पोलिसांत दाखल, गर्भपाताचे औषधही स्वताच दिले

Namdev Gharal

Ashok Khart Caseसध्या महाराष्ट्रात गाजत असलेल्या भोंदू अशोक खरात याच्या लैंगिक प्रकरणांची मालिका संपता संपेना झाली आहे. राज्यातील अनेक बड्या नेत्‍यांची नावे या प्रकरणात येत असल्याने हे हायप्रोफाईल प्रकरण बनले आहे. एका महिलेने तक्रार दाखल झाल्यानंतर या प्रकरणाला वाचा फूटली आहे. त्‍यानंतर या भोंदू बाबावर दुसरी केस पडली होती. आज रविवार 22 मार्च रोजी नाशिक येथील सरकारवाडा पोलिसांत आणखी एका पिडीतेने तक्रार दाखल केली आहे. ही या बाबावरील तीसरी केस आहे  

संबधित पिडीता विवाहीत असून तिने दिलेल्या फिर्यादीनुसार विवाहित असतांना संसारात वादविवाद होत असल्याने पीडित महिला गेली भोंदू खरातच्या कार्यालयात गेली त्‍याठिकाणी या बाबाने तिचे लैगिंक शोषण केले. धक्कादायक बाब म्हणजे लैंगिक शोषण करतांना पीडित महिला गर्भवती झाली. त्‍यामुळे या महिलेचा गर्भपात करण्यासाठी खरातने कार्यालयात बोलावून तीला औषध दिले.

त्‍यांनतर संबधित महिलेचा घटस्फोट झाला. त्‍यानंतर लग्नाचे आमिष दाखवत खरातने तांत्रिक विधीच्या नावाखाली परत तिचे शोषण केले. २०२७ मध्ये लग्न करण्याचे दिले आश्वासनही दिले होते. त्‍यावेळी तिला सांगितले की मी अवतारी पुरुष आहे, मला त्रिकाळ ज्ञान आहे तुझा घटस्फोट लिखित आहे, तू मागील जन्मातील अप्सरा आहे, मी भविष्य जाणतो असाही फिर्यादीत उल्लेख केला आहे. तसेच माझ्या नशिबात दोन विवाह आहे, तू माझ्याशी विवाह कर, मी तुला व तुझे मुलांना चांगल्या प्रकारे सांभाळ करेन असं आश्वासनही भोंदू खरातंने संबधित पिडीतेला दिले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT