Ashok Kharat Case Pudhari
मुंबई

Ashok Kharat Case: अशोक खरात प्रकरणाची निवृत्त न्यायाधीशांकडून चौकशीची मागणी; राष्ट्रीय पुरुष आयोगाचा आवाज

संमती व अत्याचार यातील फरकावर भर; प्रकरणात निष्पक्ष तपासाची मागणी

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : नाशिक जिल्ह्यातील अशोक खरात प्रकरणाची राज्य सरकारने उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीश मार्फत चौकशी व्हावी,अशी मागणी राष्ट्रीय पुरुष आयोग या संघटनेची आहे.या प्रकरणात खरात याच्याबरोबर महिलाही तितक्या याला कारणीभूत आहे,असा आरोप संघटनेचे प्रमुख अजयसिंह सेंगर यांनी शुक्रवारी केला.ते मुंबई मराठी पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

अजयसिंह सेंगर म्हणाले,अशोक खरातने महिलांशी लैंगिक शोषण केले.पण;हे चुकीचे आहे.महिलांनी सहमतीने शरीर संबध ठेवले तर त्याला अत्याचार म्हणता येणार नाही.सह‌मतीने ठेवलेले शारीरिक संबंध अत्याचार म्हणून ठरवता येणार नाहीत,असा निर्णय सर्वोच्च व उच्च न्यायालयाने अनेक प्रकरणामध्ये दिला आहे.परस्पर आकर्षणातून झालेल्या लैंगिक संबंधाना गुन्हा म्हणून मानला जाऊ शकत नाही.

लैंगिक अत्याचार आणि परस्पर संमतीने झालेले लैंगिक संबंध यामध्ये स्पष्ट फरक आहे.याप्रकरणी खरातवर पोलीसांनी खोटे गुन्हे दाखल केले आहेत.हे गुन्हे सरकारने काढून टाकावेत.खरात याचा शारीरिक व मानसिक त्रास नाशिक पोलीस देत आहे.पोलिसांकडे उपलब्ध असलेल्या व्हिडिओत स्त्री ला फोन करून तक्रार करण्यास भाग पाडत आहे असा आरोप सेंगर यांनी करत या संपुर्ण प्रकरणाची उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीश मार्फत चौकशी व्हावी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT