Ashish Shelar on Raj Thackeray Pudhari
मुंबई

Ashish Shelar on Raj Thackeray: महापुरुषांच्या पंक्तीत लावलेल्या राज ठाकरेंच्या फोटोंचे काय; आशिष शेलारांचा सवाल

मनसेच्या शाखांमध्ये महापुरुषांसोबत राज ठाकरेंचा फोटो लावल्यावर आशिष शेलारांनी सवाल उपस्थित केला. राज ठाकरेंनी कारवाई करावी, अशी मागणी.

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: फोटो प्रकरणात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अत्यंत कोत्या मानसिकतेचे प्रदर्शन केले आहे. मनसेच्या शाखांमध्ये महापुरुषांच्या पंक्तीतच राज ठाकरे यांचे फोटो बसविले आहेत.

त्यावर राज ठाकरे काय भूमिका घेणार आहेत, कोणती कारवाई आपल्या पदाधिकाऱ्यांवर करणार आहेत, असे प्रश्न मंत्री आशिष शेलार यांनी विचारले आहेत.

राज ठाकरे यांनी महापुरुषांच्या पंक्तीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो नको, असे सांगत फोटो वादावर अमित ठाकरेंची पाठराखण केली. त्यांच्या यासंदर्भातील विधानांवर शेलार यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.

महापुरुषांबद्दल सन्मानाचा भाव असला पाहिजे, असे भाजप मानते, तसा आमचा आग्रहही आहे. राज ठाकरे यांचा फोटो छत्रपती शिवराय आणि अन्य महापुरुषांच्या बरोबरीने लावला आहे, त्यावर ते कारवाई करतील तेव्हा खऱ्या अर्थाने त्यांची भूमिका सार्थक होईल, असे म्हणत शेलार यांनी राज ठाकरेंना लक्ष्य केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT