Ashish Shelar on Raj-Uddhav Thackeray Vijay Melava
मुंबई : उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या कालच्या भाषणामध्ये अप्रामाणिकता होती. ते दोघेही प्रामाणिक असते तर त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे अभिनंदन करावे लागले असते, अशी प्रतिक्रिया भाजपचे नेते आशिष शेलार यांनी ठाकरेंच्या शनिवारी झालेल्या विजयी मेळाव्यावर दिली.
आज (दि. ६) शेलार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, आधीच्या जीआरवर विचार करून हिंदी अनिवार्यता देवेंद्र फडणवीस यांनी काढली. त्यानंतर गैरसमज पसरवून वातावरण बिघडवलं जात होतं, तेव्हा फडणवीस यांनी मोठा भाऊ म्हणून शासन निर्णय मागे घेतला, तरीही ठाकरे बंधूंकडून त्यांचे आभिनंदन केले गेले नाही. कालच्या मेळाव्यात म हा महापालिकेचाच होता. उद्धव ठाकरेंच्या भाषणात तडफड दिसत होती. एकंदरीत कालचा मेळावा अवास्तव होता, अशी टीका शेलार यांनी केली.
दोन भाऊ एकत्र झाले याचा आम्हाला आनंद आहे. हिंदू प्रणालीत कुटूंबधारा महत्वाची आहे. दोन पक्ष एकत्र येतील का, हा त्यांचा प्रश्न आहे. उद्धव ठाकरे यांच्या भाषणात सत्ता गेली याचं भावना होत्या. त्यांचा हेतू अप्रामाणिक आणि राजकीय आहे, असे शेलार म्हणाले. रस्तावर गोट्या खेळा, असं म्हणत शेलार यांनी राज ठाकरेंच्या रस्तावर सत्ता आमची आहे, या वक्तव्याची खिल्ली उडवली.