अशिष शेलार Pudhari
मुंबई

Ashish Shelar:'ईव्‍हीएम'वर निवडून आलेल्या आदित्य ठाकरेंनी राजीनामा द्यावा : ठाकरे बंधूंच्या 'गर्जना' मोर्चानंतर भाजपचे आव्हान

निवडणूक आयोगाविरोधात मुंबईतील गर्जना मोर्चा नसून कोल्हाकुई मोर्चा

पुढारी वृत्तसेवा

Ashish Shelar on Thackeray Brothers Garjana Morcha

"राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांनी कधीच जनतेमध्ये जाऊन निवडणूक लढवलेली नाही. आपला पराभव लपवता येत नाही, म्हणून अत्यंत बेछूट आरोप केले जात आहेत. आदित्य ठाकरे हेही ईव्हीएमवरच निवडून आले आहेत. ते हुकूमशाहीतून निवडून आले आहेत का," असा सवाल करत निवडणूक प्रक्रियेवर आरोप करणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी सर्वप्रथम आदित्य ठाकरे यांचा राजीनामा घ्यावा, आदित्य ठाकरे यांनी राजीनामा द्यावा, असे आव्हान भाजप नेते मंत्री आशिष शेलार यांनी आज दिले. आजचा मुंबईतील गर्जना मोर्चा नसून कोल्हाकुई मोर्चा होता, अशी बोचरी टीकाही त्यांनी माध्यमांशी बोलताना केली.

राज ठाकरेंचे १३ आमदार ईव्हीएमवरच निवडून आले

आशिष शेलार म्हणाले की, आज राज ठाकरे ईव्हीएमला विरोध करत आहेत. मात्र २००९ विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाचे १३ आमदार हे ईव्हीएमवर मतदान होऊनच निवडून आले होते.

निवडणुकीतील पराभवाचे खापर निवडणूक आयोगावर फोडायचे

'मतदारयादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम' (एसआयआर) हा मतदारयादी अधिक पारदर्शक होण्यासाठीचा कार्यक्रम आहे, असे स्पष्ट करत निवडणुकीत पराभूत झालेल्या रडक्यांचा हा मोर्चा आहे. मुंबईतील ठाकरे बंधूंचा गर्जना मोर्चा नसून कोल्हाकुई मोर्चा होता, अशी बोचरी टीकाही शेलार यांनी केली.

राजकारणात कसे काम करावे याच्या टिप्स आम्ही देऊ

भारतीय जनता पक्षाला प्रशासन चालवता येत नाही, ज्ञानेश कुमारांची नेमणूक पक्षपातीपणे केली, असे बेछूट आरोप आपला पराभव लपवता न येणारे करत आहेत. मात्र आम्ही जनतेचे काम करतो. आता ठाकरे बंधूंना राजकारणात कसे काम करावे याच्या टिप्स हव्या असतील तर आम्ही देऊ, असा टोलाही शेलार यांनी लगावला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT