APMC Mango Pudhari
मुंबई

APMC Mango: एपीएमसीत हापूस आंब्याची मोठी आवक; दरात चढ-उताराची शक्यता

कोकण हापूससह परराज्यातील आंब्यांची आवक वाढली; एप्रिलमध्ये दर घसरण्याचा अंदाज

पुढारी वृत्तसेवा

नवी मुंबई : मुंबई एपीएमसीमध्ये कोकण हापूससह परराज्यातील हापूसच्या आवकमध्ये वाढ झाली असून गेल्या सात दिवसात 2 लाख 30 हजार पेट्या दाखल झाल्या. यामध्ये कोकण हापूसच्या 1 लाख 10 हजार 359 पेट्यांचा समावेश आहे. परराज्यातून 61 हजार 237 क्रेटची आवक झाली आहे. सोमवारी 30 मार्च रोजी 49 हजार 176 पेट्यांची झाली.

एपीएमसीत हापूसचे दर 2 ते 6 हजार रुपये डझन असल्याची माहिती घाऊक व्यापारी संजय पानसरे यांनी दिली. किरकोळ बाजारात हेच दर डझनला 1500 ते 2500 रुपये एवढे आहेत. मोठ्या आकारचा आंबा असल्यास त्याचे दर 2000 ते 3000 रुपये डझन आहेत.

एप्रिल महिन्यात आवक वाढल्यास कोकण हापूसचे पाच ते आठ डझन पेटीचे दर कमी होऊन 2000 ते 3500 रुपयापर्यंत येण्याची शक्यता पानसरे यांनी बोलून दाखवली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT