मुंबई : ‘युएस व्हर्सेस राज’ या आत्मचरित्राचे प्रकाशन करताना अभिनेते अनुपम खेर.शेजारी अभिनेते तुषार कपूर, राज बोथरा, त्यांच्या पत्नी पम्मी आणि मुलगी सोनिया. pudhari photo
मुंबई

Anupam Kher | सत्य अखेर जिंकतेच : अनुपम खेर

डॉ. राज बोथरा यांच्या ‘यूएस व्हर्सेस राज’ पुस्तकाचे प्रकाशन

पुढारी वृत्तसेवा

मुंबई ः भारतातील एका मध्यमवर्गीय कुटुंबातील राज बोथरा यांनी वैद्यकीय व्यवसायात अमेरिकेसारख्या देशात नामलौकिक मिळवला, पण अमली पदार्थ आणि भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यात अडकवून त्यांना तेथील कारागृहात साडेतीन वर्षे काढावी लागली. या काळात त्यांची व त्यांच्या कुटुंबाची मानहानी झाली. आपल्याकडे हा प्रकार घडला असता, तर कुणाला आश्चर्य वाटले नसते. पण जगातल्या सर्वात प्रगत अशा अमेरिकेसारख्या देशात हे घडले, या मानहानीला राज बोथरा आणि त्यांच्या कुटुंबाने धैर्याने तोंड दिले. त्यांच्या आयुष्यात घडलेली घटना ही एका चित्रपटासारखी आहे. सत्य अनेकदा वेदनादायी असते, पण ते अखेर जिंकतेच, यावर माझा विश्वास आहे आणि ते राज बोथरा यांनी कृतीतून सिध्द केले, असे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी केले.

81 वर्षीय पद्मश्री डॉ. राज बोथरा वैद्यकीय क्षेत्रातील उत्कृष्ट कार्य, समाजसेवा व भारत-अमेरिका यांच्यातील संबंध दृढ करणारे म्हणून ओळखले जात होते. परंतु डिसेंबर 2018 मध्ये अमेरिकेतील अंतर्गत गुप्तचर यंत्रणेने (एफबीआय) चुकीच्या आरोपांवरून त्यांना अटक केली. जून 2022 मध्ये अमेरिकेतील 12 ज्युरी सदस्यांनी एकमताने त्यांची निर्दोष सुटका केली. बोथरा यांनी लिहलेल्या ‘युएस व्हर्सेस राज’ या आत्मचरित्राचे प्रकाशन मंगळवारी करण्यात आले. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून खेर बोलत होते.

यावेळी अभिनेते तुषार कपूर, राज बोथरा, त्यांच्या पत्नी पम्मी आणि मुलगी सोनिया, दिग्दर्शक रवी के. चंद्रन, अभिनेत्री एमीली शाह अंकुर भाटिया, बॉलिवूड हॉलिवूड प्रॉडक्शन्सचे प्रशांत शाह हेही उपस्थित होते. यावेळी डॉ. बोथरा यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाची घोषणाही करण्यात आली.

यावेळी मनोगत व्यक्त करताना राज बोथरा म्हणाले, मी वैद्यकीय क्षेत्रात भरीव कार्य केले. परंतू अमेरिकेसारख्या देशात माझ्यासोबत घडलेल्या घटनेने मी कोसळलो होतो. माझ्यावर दाखल केलेल्या खटल्यात त्या देशाच्या आरोग्य व्यवस्थेत सर्वात मोठा भ्रष्टाचार असल्याचे चित्र रंगवण्यात आले. मी केवळ भारतीय वंशाचा असल्याने मला हा त्रास दिला गेल्याचा आरोप बोथरा यांनी केला. मात्र नीतीमुल्यांना जास्त महत्व असलेल्या देशात माझा जन्म झाल्याने मी ही लढाई लढलो व त्यात जिंकलो. अमेरिकेतील जनतेला जागृत करणे हा माझा हे पुस्तक लिहण्यामागचा उद्देश असल्याचे त्यांनी नमूद केले. बोथरा यांचे आत्मचरित्र हे प्रेरणादायी असल्याचे तुषार कपूर म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT