Prostitution Racket Crime Case Pudhari
मुंबई

Andheri Crime News: अंधेरीत ऑनलाईन देहविक्री रॅकेटचा पर्दाफाश; तरुणीची सुटका, तर वेश्यादलालाविरुद्ध गुन्हा दाखल

सहार पोलिसांची कारवाई; मोनू नावाच्या दलालाविरुद्ध गुन्हा दाखल, तरुणीला महिला सुधारगृहात पाठवले.

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: अंधेरीतील एका ऑनलाईन सेक्स रॅकेटचा सहार पोलिसांनी पर्दाफाश केला. या कारवाईत पोलिसांनी एका तरुणीची सुटका केली असून तिला महिला सुधारगृहात पाठविण्यात आले. याप्रकरणी मोनू नावाच्या एका वेश्यादलालाविरुद्ध सहार पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

मोनू नावाचा एक दलाल वेगवेगळ्या हॉटेलमध्ये ग्राहकांच्या मागणीनुसार ऑनलाईन सेक्स रॅकेट चालवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. दरम्यान, बोगस ग्राहकाच्या व्हॉटअपवर काही तरुणीचे फोटो त्याने मोनूला पाठविले होते.

हाॅटेलमध्ये पाठविलेल्या महिलेला दोन हजार आणि हॉटेलचे एक हजार द्यावे लागेल असे सांगून तरुणीला अंधेरीतील मरोळ नाका, एका हॉटेलमध्ये येण्यास सांगितले होते. २३ ऑक्टोंबरला बोगस ग्राहक मोनूने दिलेल्या हॉटेलच्या रुममध्ये गेला होता.

काही वेळानंतर तिथे एक तरुणी आली होती. बोगस ग्राहकाने इशारा देताच पोलिसांनी रुममध्ये छापा टाकला होता. यावेळी पिडीत तरुणीची पोलिसांनी चौकशी केली असता तिने तिला मोनूने पाठविल्याचे सांगितले. तपासात आलेल्या माहितीनंतर या तरुणीची पोलिसांनी सुटका केली. तिला मेडीकलसाठी पाठविण्यात आले. मेडीकलनंतर तिला महिला सुधारगृहात पाठविण्यात आले.

महिलांच्या आर्थिक परिस्थितीचा घेतला फायदा

तपासात मोनू हा त्याच्या संपर्कात असलेल्या तरुणीसह महिलांचा आर्थिक परिस्थितीचा फायदा घेऊन त्यांना झटपट पैशांसाठी ग्राहकांसोबत शारीरिक संबंधासाठी पाठवत होता. ग्राहकांकडून मिळणारी अर्धी रक्कम तो स्वत:कडे ठेवत असे आणि उर्वरित रक्कम पिडीत तरुणीसह महिलांना देत असल्याचे उघडकीस आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT