Andheri Crime Case Pudhari
मुंबई

Andheri Crime Case: तीन वर्षे लग्नाचे आश्वासन अन् नंतर दुसऱ्याच मुलीशी लग्नाची तयारी; अंधेरीत राजकीय युवा नेत्याला अटक

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर तीन वर्षे अत्याचाराचा आरोप

पुढारी वृत्तसेवा

जोगेश्वरी: अंधेरी पूर्वेला एका राजकीय क्षेत्रातील युवा नेत्याकडून एका तरुणीवर लग्नाचे आमिष दाखवून तीन वर्षे लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला असून, त्याच्‍यावर बलात्‍काराचा गुन्‍हा नोंदवून अंधेरी एमआयडीसी पोलिसांकडून अटक करण्‍यात आली आहे. आरोपीचे नाव शिवम दुबे उर्फ चोंग्या असून एमआयडीसी महाकाली परिसरात राहणारा आहे.

शिवम दुबे उर्फ चोंग्याने पीडित तरुणीकडून लाखो रुपये आणि महागडी कार घेतल्याचादेखील आरोप या तरुणीकडून तक्रारीत करण्यात आला आहे. लग्नाचे आमिष दाखवून तीन वर्षे पीडित तरुणीसोबत लैंगिक अत्याचार केल्यानंतर आरोपी हा उत्तर प्रदेशमध्ये लग्नासाठी मुलगी पाहात होता.

उत्तर प्रदेशमध्ये दुसऱ्या मुलीसोबत लग्न करत असल्याची माहिती मिळताच पीडित तरुणीने अंधेरी पूर्वेतील एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली आणि शिवम दुबे उर्फ चोंग्याविरोधात तक्रार नोंदवली.

मुलीच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी शिवम दुबे उर्फ चोंग्याला अटक केली. तक्रार दाखल करू नये, यासाठी पीडित तरुणीवर प्रचंड दबाव टाकण्‍यात आला होता. मात्र, दबावाला न जुमानता पीडित तरुणीने एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

यापूर्वीही शिवम दुबे उर्फ चोंग्या या आरोपीविरोधात गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर येत आहे. २०२३ मध्ये आरोपीवर तडीपारीची कारवाई; नंतर राजकीय दबाव आणून तडीपारी रद्द झाल्याचा पीडित तरुणीकडून दावा करण्यात आला.

सध्या आरोपी शिवम दुबे उर्फ चोंग्या हा एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात असून या आरोपीने अजून काही मुलींची अशा पद्धतीने फसवणूक केली आहे का, या संदर्भात एमआयडीसी पोलीस अधिक तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT