Mumbai Airport Flights: मुंबई विमानतळावरील फेऱ्यांत ३३% कपात? विमान कंपन्यांचा तीव्र विरोध; प्रवाशांची चिंता वाढली

२५ ऑक्टोबरपासून टी-२ मधील २६५ साप्ताहिक आंतरराष्ट्रीय स्लॉट कमी करण्याचा प्रस्ताव; हिवाळी वेळापत्रकामुळे प्रवाशांच्या नियोजनावर परिणाम होण्याची शक्यता
Mumbai airport
Mumbai Airport Pudhari
Published on: 
Updated on: 

मुंबई: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल-२ वरील आंतरराष्ट्रीय प्रस्थानाच्या फेऱ्यांमध्ये तब्बल ३३ टक्के कपात करण्यात आली आहे. या कपातीला विमान कंपन्यांनी विरोध दर्शवला आहे. हिवाळी वेळापत्रकानुसार आधीच प्रवासाचे नियोजन झाले असून, या निर्णयापूर्वी पुरेशी चर्चा झाली नसल्याचा आरोप विमान कंपन्यांनी केला आहे.

उड्डाणे रद्द केल्यास आंतरराष्ट्रीय बुकिंग आणि प्रवाशांच्या नियोजनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता असून, प्रवाशांचा प्रचंड मोठा गोंधळ उडू शकतो. तो नियंत्रित करणे अवघड जाईल, असे विमान कंपन्यांनी म्हटले आहे.

Mumbai airport
Sahil Wakode Case: साहिल वाकोडे प्रकरणात तपासाला वेग! आयआयटी-बॉम्बे संचालकांची तब्बल १० तास चौकशी

या प्रकरणात नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने हस्तक्षेप करावा, अशी मागणी विमान कंपन्यांनी केली आहे. त्याचबरोबर टर्मिनल-१ पुनर्विकास आणि टर्मिनल-२ मधील संक्रमण प्रक्रियेबाबत सर्व संबंधित भागधारकांशी पारदर्शक पद्धतीने चर्चा करावी, अशी मागणीही या कंपन्यांनी केली आहे.

आंतरराष्ट्रीय मार्गांवरील सेवा, लांब पल्ल्याची कार्गो उड्डाणे आणि बजेट विमान कंपन्यांच्या विस्तारासाठी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे क्षमता व स्लॉट वळवले जात आहेत. त्यामुळे गर्दीच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील उच्च-वाहतूक असलेली प्रादेशिक उड्डाणेही तातडीने दुसरीकडे वळवली जातील.

Mumbai airport
Urban Health Maharashtra: शहरी आरोग्य व्यवस्थेत मोठा बदल! स्वतंत्र आयुक्तालयाची रचना; महापालिकांसह नगरपालिकांना थेट अहवाल द्यावा लागणार

भौगोलिक परिस्थितीनुसार विमानतळांचा वापर नैसर्गिकरीत्या विभागला जाईल. मध्य मुंबई, दक्षिण मुंबई आणि पश्चिम उपनगरांतील प्रवासी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचा वापर सुरू ठेवतील, तर नवी मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, पुणे कॉरिडॉर आणि पनवेल यांसारख्या मुंबई महानगर प्रदेशातील भागांतील प्रवाशांचा कल नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे वळेल, असे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्राधिकरणाकडून स्पष्ट करण्यात आले.

मुंबईला कमकुवत करण्याचा प्रयत्न : आदित्य ठाकरे

मुंबईसारख्या शहराचे जगाशी असलेले व्यापार आणि प्रवासाचे संबंध तोडणे, हे शहराच्या विकासाला मोठा धक्का देण्याचा मार्ग ठरू शकतो, अशी भीती ठाकरे गटाचे नेते आ. आदित्य ठाकरे यांनी व्‍यक्त केली.

भाजपच्या सत्ताकाळात अनेक कंपन्या, उत्पादन उद्योग आणि अगदी आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्रालाही (IFSC) मुंबईबाहेर जाण्यास भाग पाडले गेले. याचा भारताच्या एकूण अर्थव्यवस्थेवरही प्रतिकूल परिणाम झाल्याचा दावा आदित्य ठाकरे यांनी केला. आता मुंबईच्या विमानतळाची क्षमता कमी करून मुंबईचे जगाशी असलेले संपर्क कमकुवत करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात आहे, असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला.

नवी मुंबईतील डी. बी. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ हा छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाला पूरक विमानतळ म्हणून विकसित होणे अपेक्षित आहे. प्रवाशांना गैरसोयीच्या परिस्थितीत प्रवास करण्यास भाग पाडणे किंवा त्यांच्याकडून अवाजवी शुल्क आकारण्याचे माध्यम म्हणून त्याचा वापर होऊ नये, असे सांगत या कथित गैरव्यवस्थेचा फायदा नेमका कोणाला करून दिला जात आहे, असा प्रश्नही आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news