Anant-Radhika Wedding
अनंत आणि राधिकाचा विवाह संपन्न Pudhari Photo
मुंबई

Anant-Radhika Wedding : नांदा सौख्य भरे.. अनंत आणि राधिकाचा विवाह संपन्न

करण शिंदे

पुढारी ऑनलाईन डेस्क : लग्नाआधीच्या काही महिन्यांच्या उत्सवानंतर अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट आता विवाहबद्ध झाले आहेत. या जोडप्याचा मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये विवाह सोहळा संपन्न झाला. या लग्नसोहळ्यासाठी आंतरराष्ट्रीय व्हीव्हीआयपींच्या उपस्थितीत एका स्वप्नवत समारंभात लग्न केले. राधिका आणि अनंतचा लग्नसोहळा शाही आणि थाटामाटात पार पडला. यासाठी जगभरातील मोठ-मोठे राजकारणी, उद्योजक, सिनेतारक-तारका, उपस्थित राहून या कार्यक्रमाला चार चांद लावले.

या जोडप्याला लग्न सोहळ्यावेळी त्यांच्या मित्रांनी आणि कुटूंबियांनी त्यांना वेढले होते. राधिका अबू जानी आणि संदीप खोसला यांनी डिजाईन केलेल्या लेहंग्यामध्ये सुंदर दिसत होती. वरमाला समारंभानंतर वधूची शैला मर्चंटनी मंडपात वराचे स्वागत केले. शतकातील लग्न म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व्हीआयपी पाहुण्यांना प्रवेश मिळावा यासाठी वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्सचा मोठा भाग सर्वसामान्यांसाठी बंद करण्यात आला होता. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाआधीच्या उत्सवाची सुरुवात मार्चमध्ये तीन दिवसांच्या भव्यदिव्य कार्यक्रमाने झाली होती. जिथे पाहुण्यांना जामनगरमधील रिलायन्स इस्टेटमध्ये नेण्यात आले होते. जामनगर उत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे रिहानाची खाजगी मैफिली, त्यानंतर दुसऱ्या दिवशी दिलजीत दोसांझचा परफॉर्मन्स असे अनेक दिल खुलास कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. अनेक महिन्याच्या सोहळ्यानंतर आज हा विवाह संपन्न झाला.

SCROLL FOR NEXT