मुंबई

Anand Puranik : धूतपापेश्वर कंपनीचे आनंद पुराणिक यांचे निधन

सोनाली जाधव

पनवेल : धूतपापेश्वर आयुर्वेद औषधी कंपनीच्या पायाभरणी आणि प्रगतीमध्ये मोलाचे योगदान असणाऱ्या आनंद तथा दादासाहेब पुराणिक (वय ८७) यांचे नुकतेच निधन झाले. शुक्रवारी सकाळी त्यांचे पार्थिव नातेवाईक आणि पनवेलकरांना अंतिम दर्शनासाठी पनवेलमधील धूतपापेश्वर कारखान्यात ठेवण्यात आले होते. त्यांच्या पार्थिवावर पनवेलच्या अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. (Anand Puranik)

Anand Puranik : धूतपापेश्वर ही पनवेलची ओळख

धूतपापेश्वर कंपनीच्या उन्नतीमध्ये दादासाहेबांचे मोठे योगदान आहे. १९६७ मध्ये त्यांनी धूतपापेश्वर कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकपदाची धुरा साभाळली. कंपनीचा विस्तार आणि प्रगतीसाठी त्यांनी कंपनीच्या कारभारात आधुनिकता आणण्यावर भर दिला. आयुर्वेद क्षेत्रात मानकीकरणाची गरज ओळखून त्यांनी धूतपापेश्वर मानक स्थापन केले. त्यासाठी आयुर्वेद क्षेत्रात संशोधन, आयुर्वेदिक वनस्पतींची लागवड आणि आयुर्वेदिक औषधाची सुरक्षितता यावर भर दिला. गुणवत्तेत कोणतीही तडजोड न करता शास्त्रोक्त, गुणवत्तापूर्ण, ब्रँडेड आणि सुरक्षित औषधांचा पुरवठा त्यांनी सुरू केला. धूतपापेश्वर या कंपनीची स्थापना १८७२ मध्ये पनवेलमध्ये झाली. या ब्रँडने १५१ वर्षांच्या वाटचालीत पनवेल शहराच्या नावलौकिकात भर घातली. धूतपापेश्वर ही पनवेलची ओळख झाली. गुणवत्तापूर्ण उत्पादनामुळे धूतपापेश्वर हा लोकप्रिय ब्रँड करण्यामध्ये दादासाहेब पुराणिक यांचे मोठे योगदान आहे.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT