Amit Shah Pudhari
मुंबई

Amit Shah Mumbai Visit: अमित शाह आज मुंबई दौऱ्यावर; भाजप नेत्यांची बैठक आणि दोन महत्त्वाच्या कार्यक्रमांना उपस्थिती

दोन महत्त्वाचे कार्यक्रम पार पडणार

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह हे मुंबई दौऱ्यावर येत असून, शनिवारी त्यांच्या उपस्थितीत दोन महत्त्वाचे कार्यक्रम पार पडणार आहेत. केंद्रीय मंत्री शाह मुंबई विभागीय भाजप आणि प्रदेश भाजपच्या नेत्यांसोबत शाह यांनी बैठक घेत राजकीय परिस्थितीचा आढावा घेणार असल्याचे समजते.

शनिवारी सकाळी ११ वाजता अमित शाह यांच्या हस्ते नॅशनल अर्बन कोऑपरेटिव्ह फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या नवनिर्मित मुख्यालयाचे अधिकृत उद्‌घाटन करण्यात येणार आहे.

सहकार क्षेत्राला बळकटी देण्याच्या दृष्टीने स्थापन करण्यात आलेल्या या संस्थेच्या नवीन कार्यालयाच्या उद्‌घाटन सोहळ्याला सहकार आणि बँकिंग क्षेत्रातील अनेक ज्येष्ठ पदाधिकारी व मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यानंतर, केंद्रीय मंत्री शाह हे मुंबई शेअर बाजारातील (बीएसई) इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर येथे आयोजित कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील.

या दोन्ही कार्यक्रमांच्या माध्यमातून ते सहकार आणि आर्थिक क्षेत्रातील दिग्गजांशी संवाद साधणार आहेत. या दौऱ्यादरम्यान राज्यातील काही प्रमुख नेत्यांशी त्यांची अनौपचारिक भेट होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT